Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत इस्कॉन इथे गीता आराधना महोत्सवाला पंतप्रधानांची उपस्थिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतल्या इस्कॉन, ग्लोरी ऑफ इंडिया कल्चरल सेंटर इथे 26 फेब्रुवारीला होणाऱ्या गीता आराधना महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

इस्कॉन भक्तांनी 2.8 मीटर आणि 800 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाची अनोखी भगवतगीता तयार केली असून, या भगवतगीतेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मूळ भगवतगीतेचे श्लोक विवेचनासह उपलब्ध आहेत. या भगवतगीतेचे पान उलटून पंतप्रधान याचे औपचारिक अनावरण करतील. यानंतर, पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

***

N.Sapre/N.Chitale/D. Rane