सौदी अरबचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अदेल बिन अहमद अल जुबीर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सौदी अरबबरोबर असलेल्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना भारत खूप महत्व देत असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.
सौदी अरबच्या परराष्ट्र धोरणात भारतासमवेत असलेल्या संबंधांना अत्युच्च प्राधान्य दिल्याचे सौदी अरबच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण सहकार्य या क्षेत्रांसह उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रादेशिक स्थितीबाबतही यावेळी बोलणी झाली.
सौदी अरबची आपली आगामी भेट उभय देशातल्या धोरणात्मक संबंधांना नवा आयाम देण्याची संधी उपलब्ध करेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
N.Chitlel/ S. Tupe/ M. Desai