Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूच्या कुन्नुर येथे नवीन वायरल लस निर्मिती कारखाना स्थापन करण्यासाठी पास्चर इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला 30 एकर जमीन वितरित करायच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूच्या कुन्नुर येथे नवीन वायरल लस निर्मिती कारखाना स्थापन करण्यासाठी पास्चर इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला 30 एकर जमीन वितरित करायच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पामुळे पीआयआय, कुन्नूर येथे वायरल लस (उदा. टीसीए कांजिण्या प्रतिबंधक लस, जपानी इंसेफ्लाइटिस लस वगैरे ) आणि एंटी सीरा (उदा. सर्प विष प्रतिबंधक आणि एंटी रैबिज सीरा) चे उत्पादन केले जाईल. जमिनीच्या हस्तांतरणासाठी कुठलाही खर्च येणार नाही.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारा या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीसाठी ‘औद्योगिक’ ऐवजी ‘संस्थागत’ असा बदल केला जाईल.

लाभ :

जमीन वितरित केल्यामुळे मुलांसाठी जीवन रक्षक लसीच्या उत्पादनाला चालना मिळेल. तसेच देशात लसीकरण सुरक्षा बळकट होईल आणि लसीचा खर्च कमी होईल आणि आयातीवरील खर्चही कमी होईल.

N.Sapre/S.Kane/P.Kor