Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नीती आयोगामध्ये अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु यांची स्थापना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नीती आयोगामध्ये अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु यांची पुरेसे मनुष्यबळ वापरुन स्थापना करण्यास मंजूरी देण्यात आली.

अटल नाविन्यता मोहीम आणि संचालनालयाच्या स्थापनेमुळे, या मोहिमेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. हा देशातील नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीचा केंद्रबिंदू ठरेल.

याविषयीचा तपशील असा,

1) अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु या संदर्भातील मुख्य आव्हाने, पुरस्काराची रक्कम तसेच अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती निर्णय घेईल आणि मार्गदर्शन करेल.

2) नीती आयोग मोहिम संचालक आणि इतर योग्य मनुष्यबळाची तरतूद नीती आयोग करेल.

3) मोहिमेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल

S.Thakur/S.Tupe/M.Desai