पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांच्या कोनशिलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या छत्तीसगडमधल्या नया रायपुर येथे अनावरण करणार आहेत.
छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्हयातल्या कुरुभात येथे शामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन अभियानाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ग्रामीण विकास समूह विकसित करण्याचे रुर्बन अभियानाचे उद्दिष्ट आहे. यामुळे या प्रदेशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळणार आहे. कौशल्य आणि स्थानिक उद्योजकता विकसित करुन, आर्थिक घडामोडी विकसित करुन तसेच पायाभूत सोयी-सुविधा पुरवून हा समूह विकास साधला जाईल.
ओदिशातल्या बारागड येथे जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करतील.
कोलकाता येथे उद्या संध्याकाळी गोडीया मिशन आणि मठाच्या शतक महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Will visit Chhattisgarh, Odisha &West Bengal tomorrow. In Chhattisgarh will lay foundation stone for houses to be built under PM Awas Yojana
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2016
Will launch Shyama Prasad Mukherji Rurban Mission, which will equip our villages with best infra & make them centres of economic growth.
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2016
In Odisha will address a public meeting in Bargarh & in WB I will attend inauguration of Centenary Celebration of Gaudiya Mission & Math.
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2016