Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोडीया मिशन आणि मठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

गोडीया मिशन आणि मठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे गोडीया मिशन आणि मठाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले.

भारताच्या दीर्घकालीन सांस्कृतिक मूल्यांमागे भारताची आध्यात्मिक जाणीव असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गेली अनेक युगे हे आध्यात्मिक भान कायम राहिले आहे.

ही जाणीव शब्दांच्या पलिकडची आहे. वैष्णव जन तो तेणे कहिए हे त्याचे मोठे उदाहरण असल्‍याचे पंतप्रधान म्हणाले.

आधुनिक संदर्भात वैष्णव जन ऐवजी जन प्रतिनिधी हा शब्द सहज बसतो.

भारतीय समाजात, सुधारणा या सदैव आतून आल्या आहेत. आणि राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.

यानंतर पंतप्रधानांनी गोडिया मठात प्रार्थनाही केली.

N.Chitale/S.Tupe/M.Desai