Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि नामिबिया आणि पनामा यांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि नामिबिया निवडणूक आयोग आणि पनामा निवडणूक न्यायाधिकरण दरम्यान निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये :

या करारात असे मानक अनुच्छेद/कलमे समाविष्ट आहेत जे निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देतील . यामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संघटनात्मक आणि तांत्रिक विकास क्षेत्रांतील माहिती आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करणे, माहितीचे आदान-प्रदान , संस्थागत बळकटीकरण आणि क्षमता निर्मिती, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नियमित विचार-विनिमय आदींचा समावेश आहे.

प्रभाव:

या करारामुळे द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.नामिबिया निवडणूक आयोग आणि पनामा निवडणूक न्यायाधिकरण यांच्यासाठी तांत्रिक सहकार्य/क्षमता निर्माण करणे हा या कराराचा उद्देश आहे. निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्य आणि त्या देशांमध्ये निवडणुका घेण्यात मदत करणे याचा यात समावेश आहे. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना चालना मिळेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar