Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दादरा आणि नगर-हवेलीच्या सिल्वासा येथे पंतप्रधानांनी दिली भेट

दादरा आणि नगर-हवेलीच्या सिल्वासा येथे पंतप्रधानांनी दिली भेट

दादरा आणि नगर-हवेलीच्या सिल्वासा येथे पंतप्रधानांनी दिली भेट

दादरा आणि नगर-हवेलीच्या सिल्वासा येथे पंतप्रधानांनी दिली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथे काही विकासात्मक प्रकल्पांच्या शिलान्यासाचे उद्‌घाटन तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सायली येथे वैद्यकीय महाविद्यालयाची कोनशिला ठेऊन येथे माहिती तंत्रज्ञान धोरणाचे उद्‌घाटनही केले. पंतप्रधानांनी आरोग्य मोबाईल ॲप आणि दारोदार जाऊन घनकचरा एकत्रित करणे, वेगळा करणे आणि त्यावर प्रक्रिया या प्रणालीचेहि उद्‌घाटन केले.

पंतप्रधानांनी आयुष्यमान भारताच्या लाभार्थ्यांना गोल्ड कार्ड तसेच वन अधिकार पत्राचे वितरण केले. सर्वाजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, चौदाशे कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांची कोनशिला आज ठेवण्यात आली असून, हे प्रकल्प विविध दृष्टीकोनाने शिक्षण आरोग्य पायाभूत सेवा आणि संलग्नता या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, नवीन औद्योगिक धोरण आणि नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण हे उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान म्हणाले कि, आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रा नुसार काम करत आहोत. पंतप्रधानांनी दादरा नगर हवेली दमन आणि दीव हे ‘खुले शौचालय मुक्त’ झाले असल्याचे नोंदविले.

ते पुढे म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशांच्या प्रत्येक कुटुंबाला एलपीजी, विद्युत आणि जल संलग्नता मिळालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, केंद्रशासित प्रदेश आणि शहरी गरिबांना घरे आवंटीत करण्यात आली आहेत. ते पुढे म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशात, विकास प्रकल्पांसाठी, गेल्या तीन वर्षात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. तसेच दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे पहिल्यांदाच वैद्यकीय महाविद्यालयाची कोनशिला उभारल्या गेली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय या वर्षीच चालू करण्यात येईल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज मितिला केंद्रशासित प्रदेशात केवळ 15 वैद्यकीय जागा उपलब्ध होत्या परंतु या महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर दीडशे जागा उपलब्ध करून देण्यात येतील. ते पुढे म्हणाले की, या वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे लोकांना वैद्यकीय सोयी उपलब्ध होणार आहेत.

आयुष्यमान भारत बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून जवळपास दहा हजार गरीबांना दररोज या योजनेद्वारे आरोग्य सेवा देण्यात येतात. फक्त शंभर दिवसात सात लाख गरिबांनी या योजनेद्वारे फायदा घेतला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांना स्थायी रूपात घर देण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. मागील सरकारने पाच वर्षात 25 लाख घरांची निर्मिती केली तर आमच्या सरकारने पाच वर्षात 1 कोटी 25 लाख घरांची बांधणी केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी केवळ दादरा आणि नगर-हवेली मध्ये 13 हजार महिलांना विनामूल्य गॅस जोडणी दिली असल्याचे नमूद केले. ते म्हणाले आदिवासी भागातील लोकांचे कल्याण या योजनेद्वारे करण्यात येत आहे. जनधन योजना अंतर्गत, केंद्राने वन उत्पादने मूल्याधारित करण्याचे ठरविले आहे तसेच आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी काही मापदंड अवलंबिण्यात येत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, दादरा आणि नगर हवेली येथे पर्यटनाच्या मोठ्या संभाव्यता आहेत त्या दृष्टीने हा भाग पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, निलक्रांतीच्या अंतर्गत, मत्स्य व्यवसाईकांचे उत्पादन वाढण्यासाठी काही योजना अवलंबण्यात येणार असून, मत्स्य क्षेत्र विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअंतर्गत या क्षेत्राला प्रोत्साहनासाठी 500 कोटी रुपयांचे व्यवस्थापन झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 125 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी ते अविरत परिश्रम करत असल्याचे सांगितले.

B.Gokhale/D. Rane