पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 13 नवीन केंद्रीय विद्यापीठांची आवर्ती खर्च आणि परिसरातील आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी 3639.32 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. हे काम 36 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल.
मंत्रिमंडळाने या केंद्रीय विद्यापीठांसाठी पूर्वीच्या 3000 हजार कोटी रुपयांच्या मंजुरी व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या खर्चासाठी 1474.65 कोटी रुपयांच्या निधीला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
ही नवीन विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 अंतर्गत बिहार, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर (दोन), झारखंड, कर्नाटक, केरळ , ओदिशा, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे :
दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ, गया, बिहार
हरियाणा केंद्रीय विद्यापीठ, महेन्द्रगढ़
जम्मू केंद्रीय विद्यापीठ, जम्मू
झारखंड केंद्रीय विद्यापीठ,रांची
कश्मीर केंद्रीय विद्यापीठ, श्रीनगर
कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, गुलबर्गा
केरळ केंद्रीय विद्यापीठ,कासरगोड
ओडिशा केंद्रीय विद्यापीठ, कोरापुट
पंजाब केंद्रीय विद्यापीठ, भटिंडा
राजस्थान केंद्रीय विद्यापीठ,बांदेर सिंदरी, राजस्थान
तामिळनाडू केंद्रीय विद्यापीठ, तिरूवरूर
गुजरात केंद्रीय विद्यापीठ,गुजरात
हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ,
प्रभाव:
यामुळे उच्च शिक्षण उपलब्ध होईल आणि अन्य विद्यापीठांना अनुकरणासाठी मापदंड स्थापित केले जातील. यामुळे शैक्षणिक सुविधांमधील प्रादेशिक असमतोल कमी होण्यास मदत होईल.
***
B.Gokhale/S.Kane/P.Kor