Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मलेशियाचे संसद सदस्य दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मलेशियाचे संसद सदस्य दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मलेशियाचे संसद सदस्य दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मलेशियाच्या संसदेचे सदस्य आणि पार्ती केडीलन राकयात पार्टीचे नेते दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

केशवन सुब्रमणियन आणि संथारा कुमार रामनायडू हे दोन संसद सदस्यही इब्राहिम यांच्यासमवेत उपस्थित होते.

पीकेआर पार्टीचे अध्यक्ष म्हणून इब्राहिम यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी इब्राहिम यांचे अभिनंदन केले. मे 2018 मध्ये त्यांच्यासमवेत झालेल्या भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी केले. मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर महंमद यांच्याविषयी पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली.

परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

S.Tupe/N.Chitale/P.Kor