इथे जमलेले बंधू -भगिनी आणि तरुण मित्रांनो,
ओदिशाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करण्याचा आमचा संकल्प आज आणखी एका महत्वपूर्ण टप्प्यावर पोहचला आहे. थोड्या वेळापूर्वी 14 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. या योजनांमध्ये उच्च शिक्षण, आरोग्य, वायू, रस्ते आणि सांस्कृतिक महत्वाचे अनेक प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प ओदिशाचा विकास, येथील जनतेचे जीवन सुलभ आणि सुगम बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे , ओदिशाच्या प्रत्येक व्यक्तीचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो, देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या केंद्र सरकारकडून ओदिशासह संपूर्ण पूर्व भारताच्या विकासाकडे इतके लक्ष दिले जात आहे. देशाच्या समतोल विकासाला प्राधान्य देत गेली चार वर्षे सातत्याने येथील पायाभूत विकासाशी संबंधित आवश्यक सुविधांच्या अनेक प्रकल्पांचा विस्तार झाला आहे. केंद्र सरकार पूर्व भारताला पूर्व आशिया आणि दक्षिण आशियाचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्रावर वाटचाल करत ओदिशाच्या प्रत्येक व्यक्तीचा, ओडिशाच्या कानाकोपऱ्याचा विकास करण्याचा संकल्प करत केंद्र सरकार पुढे जात आहे.
मित्रांनो, आज आयआयटी भुवनेश्वर ओदिशाच्या प्रतिभावंतांसाठी, युवकांसाठी समर्पित करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. याच्या बांधकामासाठी 1260 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हे भव्य संकुल आगामी काळात ओडिशाच्या युवकांच्या स्वप्नांचे …केंद्र तर बनेलच , त्याचबरोबर इथल्या युवकांसाठी रोजगाराचे नवीन माध्यम देखील सिद्ध होईल. आयआयटीच्या या संकुलात ओदिशाचे स्थानिक उद्योग, येथील जंगलांमधील साधनसंपत्तीशी संबंधित संशोधन होईल.येथील आदिवासी बंधू-भगिनींचे जीवन अधिक उत्तम बनवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर संशोधन केले जाईल. ही संस्था देशासाठी आणि जगासाठी उच्च दर्जाचे अभियंते आणि उद्योजक तर निर्माण करेलच, ओदिशालाही उच्च तंत्रज्ञानाच्या औद्योगिक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल.याशिवाय आगामी काळात बरहामपुर येथे सुमारे 1600 कोटी रुपये खर्चून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे काम देखील सुरु होणार आहे.
मित्रांनो, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अशा अनेक संस्थाना गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने देशभरात मान्यता दिली आहे. याद्वारे सरकारच्या नवीन भारताच्या स्वप्नाला प्रोत्साहन दिले जात आहे, ज्याअंतर्गत, नवीन भारत हे जगासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्टार्टअपचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला आशा आहे की, ओदिशाची ही नवीन संस्था ज्ञान आणि संशोधनाची ओदिशाची जुनी ओळख आणखी मजबूत करेल. मित्रांनो, शिक्षणाबरोबरच जनतेच्या आरोग्यावरही केंद्र सरकार अतिशय गांभीर्याने लक्ष देत आहे. याच भावनेने खोरदा भुवनेश्वर इथे बांधण्यात आलेल्या ईएसआआयसी रुग्णालयात करण्यात आलेल्या विस्तारीकरणाचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे.
आज आधुनिक सुविधांनी युक्त या रुग्णालयाचे देखील लोकार्पण करण्यात आले आहे. जे जुने रुग्णालय होते त्याची क्षमता आता दुप्पट झाली आहे. आता हे शंभर खाटांचे मोठे रुग्णालय झाले आहे. दूर-दुर्गम गावांतील जंगलांमध्ये राहणाऱ्या माझ्या आदिवासी कुटुंबांना उपचारासाठी भटकावे लागू नये हे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्र उभारण्याचे काम जलद गतीने सुरु आहे. ओदिशामध्ये अंदाजे साडे अकराशे आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढल्या एक दोन वर्षात जेव्हा ही सर्व केंद्रे बनून तयार होतील तेव्हा ओदिशामध्ये आणि देशभरात आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन होईल.
मित्रांनो , ओदिशामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्याबरोबरच रस्ते जोडणी मजबूत करण्याचे काम देखील केंद्र सरकार द्वारा वेगाने केले जात आहे. राज्यातील तमाम दुर्गम क्षेत्रांना रस्त्यांनी जोडण्यासाठी योजनांना गती दिली जात आहे. गावे आणि शहरांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. ओदिशामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी 10 हजार किलोमीटर पर्यत नेण्याच्या दिशेने केंद्र सरकार वेगाने वाटचाल करत आहे. याच उद्दिष्टांतर्गत आज रस्ते, महामार्गाशी निगडित चार प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. चांदीखोले-भद्रक मार्ग आणि टांगी-पोईटोला मार्गाचे सहा पदरीकरण असेल, कटक-आंगुल मार्गाचे रुंदीकरण असेल किंवा खांडागिरि उड्डाणपुलाचे बांधकाम असेल, सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचे हे सर्व प्रकल्प ओदिशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. या सुविधांमुळे लोकांचे येणे-जाणे सुकर होईल. व्यापार-उद्योग करणे देखील सुलभ होईल.
मित्रांनो, ओदिशाच्या पायाभूत सुविधांचा जसजसा विस्तार होत आहे तसतसे येथील उद्योगधंद्यांसाठी देखील नवीन रस्ते, नव्या संधी खुल्या होत आहेत. विशेषतः तेल आणि वायू क्षेत्रात ओदिशाचे भविष्य खूप उज्जवल आहे. पारादीप हैदराबाद पाइपलाइन ओदिशाला नवी ओळख देणार आहे. इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण करणार आहे. सुमारे 1200 किलोमीटरची ही पाइपलाइन ओदिशाबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या पेट्रोलियम पदार्थांच्या गरजा देखील पूर्ण करेल. पारादीप तेलशुद्धीकरण प्रकल्पातून निघालेले पेट्रोल, डीझेल, केरोसीन आणि विमान इंधन अनेक शहरे आणि गावांच्या गरजा पूर्ण करेल. अंदाजे साडेचार हजार कोटी रुपये खर्चाने तयार होणाऱ्या या प्रकल्पांतर्गत बहरामपुर, विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाड़ा मध्ये डिलिव्हरी कम पम्पिंग स्टेशन आणि पाईपलाईन बनल्यानंतर ओदिशा एक प्रकारे पूर्व भारताचे पेट्रोलियम केंद्र बनणार आहे.
मित्रांनो, देशातील गरीबातील गरीब कुटुंबाला स्वच्छ, धुरापासून मुक्त इंधन देण्यासाठी सरकार पूर्णपणे समर्पित आहे. देशातील प्रत्येक घरापर्यंत एलपीजी सिलेंडर पोहचवण्यात यश मिळवण्यात तर आम्ही अगदी जवळ पोहचलो आहोत. आता पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस देण्याचे व्यापक अभियान देखील सरकारने सुरु केले आहे. विशेषतः पूर्व भारताला पाईपद्वारे गॅस पोहचवण्याच्या दिशेने प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना वेगाने सुरु आहे. उत्तर प्रदेशापासून ओदिशापर्यंत पीएनजीची लाइन टाकण्यासाठी हजारों कोटी रुपये खर्च केले जात आहेत. याअंतर्गत आज जगदीशपुर, हलदिया, बोकारो, धामरा पाइप लाइन प्रकल्पाच्या बोकारो-आंगुल विभागाची आज पायाभरणी करण्यात आली. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चाने बनणारा हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ओदीशातील पाच जिल्ह्यांबरोबरच झारखंडचे सहा जिल्हे देखील पाईप गॅसशी जोडले जातील.
मित्रांनो, साधने, संसाधनांचा विकास तोपर्यंत अपूर्ण आहे, जोपर्यंत सांस्कृतिक विकासाचा आयाम त्याच्याशी जोडला जात नाही. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या ‘पायका’ क्रांतिला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक विशेष टपाल टिकट आणि नाणे देखील आज जारी करण्यात आले. या व्यतिरिक्त पायका क्रांतिचे नायक बक्शी जगबंधु यांच्या नावाने उत्कल विद्यापीठात एक अध्यासन देखील सरकारने सुरु केले आहे. हे अध्यासन पायका आणि आदिवासी आंदोलनासह तमाम राष्ट्रवादी आंदोलनाच्या संशोधनाशी निगडित विषयांवर संशोधनाचे केंद्र तर असेलच , त्याचबरोबर ते ओदिशाच्या आदिवासी समाजात आलेल्या सामाजिक आणि आर्थिक बदलांना समजून घेण्याच्या दिशेने देखील महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील.
मित्रांनो, पायकाच्या नायकांना सन्मान देण्याबरोबरच ओदिशाचा समृद्ध अध्यात्मिक वारसा जगासमोर आणण्याकडेही लक्ष दिले जात आहे. कटक जिल्ह्यातील ललितगिरी येथे पुरातत्व वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन देखील करण्याची संधी मला मिळाली आहे. यामध्ये बौद्ध काळातील प्रारंभापासूनचे महत्वपूर्ण अवशेष ठेवण्यात आले आहेत. हे वस्तुसंग्रहालय जगभरातील बौद्ध विचारसरणीच्या लोकांना , संशोधनकारांना आकर्षित करेलच, इतरांसाठीही , पर्यटकांसाठी देखील ते आकर्षणाचे केंद्र असेल. ओदिशाच्या पर्यटन उद्योगाकडून याला आणखी बळ मिळणार आहे. ज्यातून इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
मित्रांनो , केंद्र सरकार ओदिशाच्या संपूर्ण विकासासाठी समर्पित आहे. ओदिशाचा पायाभूत विकास,जनतेच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मी तुम्हाला आश्वासित करतो की हे काम अखंड सुरु राहील. ओदिशा नवीन भारताच्या विकासाचे एक महत्वपूर्ण इंजिन बनावे. यासाठी आपण सर्वानी एकत्र यायला हवे, पुढे जायला हवे, आणि एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. याच इच्छेसह पुन्हा एकदा या विविध विकास प्रकल्पांसाठी ओडिशाच्या प्रत्येक नागरिकाचे मनापासून अभिनंदन करतो. आणि जय जगन्नाथ यांचे स्मरण करत तुम्हा सर्वाना खूप-खूप धन्यवाद.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
ओडिशा के विकास के लिए समर्पित भाव से काम करने का हमारा संकल्प आज एक और अहम पड़ाव पर पहुंचा है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
थोड़ी देर पहले 14 हज़ार करोड़ रुपए से अधिक के अनेक प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण किया गया है: PM
आज IIT भुवनेश्वर को युवाओं के लिए समर्पित करने का सौभाग्य मुझे मिला है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
इसके निर्माण में 1260 करोड़ रुपए खर्च किए गए हैं।
ये भव्य कैंपस आने वाले समय में ओडिशा के नौजवानों के सपनों के सेंटर तो बनेगा ही, यहां के युवाओं के लिए रोज़गार का नया माध्यम भी सिद्ध होगा: PM
शिक्षा के साथ-साथ जनता के स्वास्थ्य पर भी केंद्र सरकार पूरी गंभीरता से ध्यान दे रही है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
इसी भावना के साथ खोरधा-भुवनेश्वर में बने ESIC अस्पताल में हुए विस्तारीकरण का काम भी पूरा किया जा चुका है।
आज आधुनिक सुविधाओं से युक्त इस अस्पताल को भी जनता के लिए समर्पित किया गया है: PM
पूर्वी भारत को पाइप से गैस पहुंचाने की दिशा में प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना तेज़ गति से चल रही है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
इसी के तहत आज जगदीशपुर-हल्दिया-बोकारो-धामरा पाइपलाइन प्रोजेक्ट के बोकारो-आंगुल सेक्शन का शिलान्यास आज किया गया है: PM
साधनों-संसाधनों का विकास तब तक अपूर्ण है जब तक सांस्कृतिक विकास का आयाम उससे नहीं जुड़ता।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
देश के पहले स्वतंत्रता संग्राम में अहम भूमिका निभाने वाली पायका क्रांति के 200 वर्ष पूरे होने पर एक विशेष डाक टिकट और सिक्का भी आज जारी किया गया है: PM
पायका के नायकों को सम्मान देने के साथ-साथ ओडिशा की समृद्ध आध्यात्मिक विरासत को दुनिया के सामने लाने का काम भी किया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
कटक जिले के ललितगिरी में आर्कियोलॉजी म्यूज़ियम का उद्घाटन भी आज किया गया है: PM
केंद्र सरकार ओडिशा के संपूर्ण विकास के लिए समर्पित है।
— PMO India (@PMOIndia) December 24, 2018
ओडिशा के इंफ्रास्ट्रक्चर से लेकर जन-जन के विकास के लिए तमाम कदम उठाए जा रहे हैं।
मैं आपको विश्वास दिलाता हूं कि ये काम निरंतर जारी रहेगा: PM