पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘टाईमलेस लक्ष्मण’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यावर हे पुस्तक आधारलेले आहे.
लक्ष्मण यांच्या कालातीत प्रवासाचा भाग होण्याचा आपल्याला विशेष आनंद होत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आ.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा खजिना आता सर्वांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
समाजाची जडण-घडण आणि समाजातले विविध रंग समजून घेण्यासाठी आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे निरिक्षण करुन अभ्यास करता येऊ शकतो असे पंतप्रधानांनी सांगितले. हा अभ्यास हा केवळ आर.के.लक्ष्मण किंवा त्यांच्या आठवणी समजून घेण्यासाठी नाही तर लक्ष्मण हा देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये दडलेला असून त्यांचा अभ्यास करण्यासाठी ही व्यंगचित्र मार्गदर्शक ठरतात असे ते म्हणाले.
लक्ष्मण यांचा कॉमन मॅन कालातीत आणि देशव्यापी आहे. प्रत्येक भारतीय नागरिक आणि प्रत्येक पिढी स्वत:ला या कॉमन मॅनमध्ये बघू शकते असे पंतप्रधान म्हणाले. या कॉमन मॅनमधले असामान्यत्व समाजासमोर आणण्यासाठीच पद्म पुरस्कारांच्या शिफारशींची प्रक्रिया बदलली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
***
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
In Mumbai today, released the book ‘Timeless Laxman.’ This book is based on the life of the great RK Laxman, whose rich work and indomitable spirit continue to be admired and remembered by every Indian. pic.twitter.com/lm26VsDMyQ
— Narendra Modi (@narendramodi) ১৮ ডিসেম্বর, ২০১৮