Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची पंतप्रधानांनी भेट घेतली

अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची पंतप्रधानांनी भेट घेतली

अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची पंतप्रधानांनी भेट घेतली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची आज भेट घेतली.

पंतप्रधानांनी डॉ. अब्दुल्ला यांचे हार्दिक स्वागत केले. जयपूर येथे होणाऱ्या दहशतवाद विरोधी परिषद 2016ला डॉ. अब्दुल्ला संबोधित करणार आहेत.

डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अफगाणिस्तानच्या यशस्वी दौऱ्याचा पुनरुच्चार यावेळी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केला. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला या दौऱ्याने पुन:ऊर्जा प्रदान केली आहे. अफगाणिस्तान मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी भारताकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल अब्दुल्ला यांनी भारताचे मन:पूर्वक कौतुक केले.

भारतीयांचे संरक्षण करण्यासाठी विशेषत: 4-5 जानेवारी 2016ला मझार-ए-शरीफ येथे भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्या दरम्यान भारतीयांचे संरक्षण करताना अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा दल आणि सरकारने दाखविलेल्या शौर्य व त्यागाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

द्विपक्षीय आणि प्रादेशिक क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत व्हावी, याकरिता दोन्ही नेत्यांनी आपल्या विचारांचे यावेळी आदान प्रदान केले.

S.Mhatre / I. Jhala / M. Desai