Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू काश्मीर तसंच नक्षल प्रभावित राज्यात 17 भारतीय राखीव तुकड्या निर्माण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


जम्मू-काश्मीर तसंच नक्षल प्रभावित राज्यात 17 भारतीय राखीव तुकड्या निर्माण करण्याच्या निर्णयाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये पाच, छत्तीसगडमध्ये चार, झारखंडमध्ये तीन, ओदिशात तीन तर महाराष्ट्रात दोन तुकड्या असतील.

यामध्ये स्थानिक युवकांची भर्ती केली जाईल. यासाठी गरज भासल्यास ही राज्यं शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा शिथील करु शकतील.

जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या पाच तुकड्यांमध्ये कॉन्स्टेबल आणि चतुर्थ श्रेणी पदापैकी 60 टक्के जागा जम्मू-काश्मीरमधल्या सीमावर्ती जिल्ह्यातून भरल्या जातील.

नक्षल प्रभावित राज्यात कॉन्स्टेबलच्या 75 टक्के रिक्त जागा सुरक्षासंबंधी खर्च योजनेअंतर्गत 27 महत्त्वाच्या जिल्ह्यातून भरण्यात येतील.

केंद्र सरकारने 1971 मध्ये भारतीय राखीव तुकड्यासंदर्भातली योजना सुरु केली.

N.Chitle/S.Tupe/M.Desai