Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य


गुरुदेव दत्त ! दत्तपीठात मी पहिल्यांदाच आलो आहे मात्र या परंपरेशी मी गेली अनेक वर्षे जोडलेा गेलो आहे. नर्मदेच्या तीरावर जो कोणी आपला काळ व्यतीत करतो, नर्मदेच्या तीरावर कोणाला साधना करण्याची संधी मिळाली तर गुरुदेव दत्तांशिवाय साधनेचा आरंभ होत नाही. तुम्ही नरेश्वरला जा, गुरुदेश्वरला जा संपूर्ण भाग दत्त कृपेने भारला आहे. संपूर्ण नर्मदेची साधना आहे ही. नर्मदेचे साधक, नर्मदेची परिक्रमा करणारे दोनच मंत्रांचा जप करतात नर्मदा हर आणि गुरुदेव दत्त. हे दोन मंत्रच संपूर्ण साधनेचा भाग असतात. गेल्या आठवडयातच गुरुजी गुजरातला जाऊन आले. कच्छच्या रणात जाऊन आले. रणउत्सव त्यांनी पाहिला याबद्दल मला आनंद झाला. तिथे कालो डुंगर इथे गुरुदेवांचे जन्मस्थान, तीर्थस्थान आहे आणि दत्त जयंतीला तिथे मोठा उत्सव होतो. हिंन्दुस्थान मधले हे सर्वांत शेवटचे ठिकाण. त्यानंतर वाळवंट आणि वाळवंटाच्या पलिकडे पाकिस्तान. गुरुदेव दत्तांच्या स्थानी, आत्ताच झालेल्या दत्तजयंतीनिमित्त गुरुदेव तिथे गेले होते आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दत्त पीठाला भेट देण्याचे भाग्य मला लाभले.

या परंपरेने सामाजिक काम तर केले आहेच, आपल्या देशात संत, ऋषीमुनीं जे काही कार्य करतात ते समाजासाठीच करतात. समाजहितासाठीच करतात. मात्र त्याची वेगळी ओळख नसते कारण त्यांना वाटते हे माझे कर्तव्यच आहे आणि म्हणूनच त्याचा डांगोरा ते पिटत नाहीत. म्हणूनच जगाला असे वाटत असते की भारतातले संत महंत साधू महात्मा आपला वेळ पूजा पाठ आणि त्या संदर्भातच व्यतीत करतात. मात्र आपण पाहिले तर आपल्या देशात ऋषी, संतपरंपरेने समाज उद्धाराचं समाजसेवेचे कार्य केले आहे. स्वामीजींचे पर्यावरण रक्षण, असूदे, नादब्रम्ह उपासना असूदे, नादब्रम्ह उपासना अप्रतिम मानली जाते. नादब्रम्ह सामर्थ्याचा आपल्या परंपरेने स्वीकार केला आहे. खूप कमी जण नादब्रम्ह उपासना करु शकतात. ब्रम्हांच्या या रुपाची जाणीव अनुभवू शकतो बाकी रुपांची जाणीव अनुभवू शकत नाही. नादब्रम्ह हे ब्रम्हरुप आपण अनुभव शकतो आणि त्याच्या साधनेव्दारा सामान्य जनांना ब्रम्हांपर्यंत नेण्‍यासाठीचे नाद माध्यम, स्वामीजीनी हे करुन दाखविले आहे. विश्वाच्या या फलकावर, आपल्या या महान परंपरेचे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, कारण सामान्य मानव गीत आणि संगीत जाणतो मात्र त्याला आध्यात्मीक स्वरुपाने जाणणे आणि त्याला ब्रम्हाशी जोडणे हे काम पूज्य स्वामीजीनी केले आहे. जगात अनेक ठिकाणी हे कार्य केले आहे. अशा काही ठिकाणी जाण्यांची संधी मला लाभली मात्र मूळ ठिकाणी येण्यांची संधी प्रथमच मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो.

स्वामीजीना माझा प्रणाम, समाजसेवेच्या त्यांच्या कार्यात भगवान दत्तांचा कृपाशिर्वाद सदैव लाभू दे. गरीबातल्या गरिब, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या सेवेसाठी ही शक्ती कामी येऊ दे ही माझी प्रार्थना आहे. गुरुदेव दत्त !

SmkN.ChitleI.Jhala