Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भूतकाळ बदलण्याची क्षमता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहे, असे ते म्हणाले. सॅनफ्रान्सिस्को, टोकियो आणि बिजिंग नंतर जगातले हे चौथे केंद्र असून यामुळे भविष्यातील अफाट संधींसाठी दारे खुली होती, असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रांचा अभ्यास, इंटरनेट, ब्लॉकचेन आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत विकासाची नवी शिखरे पार करेल आणि येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतासाठी हे केवळ औद्योगिक परिवर्तन नव्हे तर सामाजिक परिवर्तन आहे, असे ते म्हणाले. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे, असे सांगत देशात होत असलेल्या कामाला यामुळे गती मिळेल तसेच व्याप्ती वाढेल असे ते म्हणाले.

डिजिटल भारत चळवळीमुळे देशातल्या गावांपर्यंत इंटरनेट सेवा, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या सुविधा कशा प्रकारे पोहोचल्या याचा उल्लेख त्यांनी केला. भारतातील सामायिक सेवा केंद्रात वेगाने होत असलेल्या वाढीबद्दल त्यांनी माहिती दिली. जगात भारतामध्ये मोबाईल डेटाचा सर्वाधिक वापर होतो आणि भारतात कमी दरात ही सेवा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि आधार, यूपीआय, ई-नाम आणि जीईएम यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धीमत्तेतील संशोधनासाठी काही महिन्यांपूर्वी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राष्ट्रीय रणनिती ठरवण्यात आली होती. या नवीन केंद्रांमुळे या प्रक्रिया बळ मिळेल, असे ते म्हणाले. चौथी औद्योगिक क्रांती आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा विस्तार यामुळे उत्तम आरोग्य सेवा कमी खर्चात उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनाही मदत मिळेल आणि कृषी क्षेत्रासाठी ती सहाय्यभूत ठरेल, असे ते म्हणाले. परिवहन आणि स्मार्ट मोबीलिटी यांसह अन्य क्षेत्र ज्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाऊ शकते, त्याचा त्यांनी उल्लेख केला. भारतात जेव्हा या क्षेत्रांमध्ये काम सुरू होईल तेव्हा ‘सॉल्व्ह फॉर इंडिया, सॉल्व्ह फॉर द वर्ल्ड’ हे एक उद्दिष्ट असेल.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ भारत उठवू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. यामध्ये भारत भरीव योगदान देईल, असे ते म्हणाले. कौशल्य भारत अभियान, स्टार्टअप भारत आणि अटल नवोन्मेष अभियान यांसह सरकारी उपक्रम आपल्या युवकांना नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज करत आहेत, असे ते म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/P.Kor