Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2017 च्या आयपीएस प्रशिक्षणार्थींनी घेतली पंतप्रधानांची भे


भारतीय पोलीस सेवेच्या 2017च्या तुकडीतील सुमारे 100 प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी समर्पितपणे काम करण्याची वृत्ती, विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडण्याच्या महत्वावर भर दिला. आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सुमारे 33 हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यागाची आठवण पंतप्रधानांनी यावेळी काढली.

सुशासन, शिस्त आणि वर्तन, महिला सक्षमीकरण आणि न्याय वैद्यक शास्त्र यासारख्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor