Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“स्वच्छता ही सेवा” मध्ये पंतप्रधानांचा सहभाग, दिल्लीतील शाळेमध्ये केले श्रमदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज “स्वच्छता ही सेवा” चळवळीमध्ये सहभागी झाले. दिल्ली स्थित एका शाळेमध्ये त्यांनी श्रमदान केले.

देशभरातील 17 ठिकाणांहून उपस्थित लोकांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चळवळीचे लोकार्पण केल्यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान मध्य दिल्लीतील राणी झाशी मार्गावरील बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयात पोहचले. तेथे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली व स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शाळेतील तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि स्वच्छतेप्रती त्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेपर्यंतचा आणि शाळेपासूनचा प्रवास कोणत्याही राजकीय शिष्टचाराशिवाय सर्वसाधारण रहदारीमधून केला. त्यांच्या या भेटीकरिता कुठलीही विशेष रहदारी व्यवस्था करण्यात आली नव्हती.

अनुसूचित जातीच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन खुद्द डॉ. आंबेडकरांनी 1946 मध्ये या प्रशालेच्या परिसर खरेदी केला होता.