तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान संसदेचे सदस्य इम्रान खान यांच्या विनंतीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांची भेट घेतली. इम्रान खान यांनी पंतप्रधानांना पाकिस्तानला येण्याचे आमंत्रण दिले.
या सदिच्छा भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधात नुकत्याच झालेल्या प्रगतीचे स्वागत करण्यात आले. तसेच यामुळे दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वृध्दींगत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
S.Tupe/M.Desai