Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्ही.एस.नायपॉल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही.एस. नायपॉल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

‘सर व्ही. एस. नायपॉल हे त्यांच्या व्यापक कार्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील. इतिहास, संस्कृती, वसाहतवाद, राजकारण आणि अन्य क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांप्रती माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो.’ असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor