माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रकाश जावडेकर, पियूष गोयल आणि सन्मानित अतिथीगण..
मला भारतीय शामियानाचे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे.
पॅरिसमधील ऐतिहासिक शिखर परिषदेचा आज पहिला दिवस आहे.
पॅरिस आणि फ्रान्सचा संकल्प आणि त्याच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी एकत्रित आलो आहोत.
संपूर्ण जग 196 देश या जगाचे भविष्य सावरण्यासाठी तसेच आपल्या पृथ्वीचे आरोग्य चांगले रहावे याकरिता एकजूट झाले आहेत.
ही शिखर परिषद भारताच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
हा शामियाना आपली परंपरा, आपला विकास, आपले तंत्रज्ञान, आपल्या आकांक्षा आणि आपल्या चांगल्या कामगिरीची खिडकी आहे.
भारताची नवीन आर्थिक विकास गती आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकर्षणाचा विषय आणि जागतिक संधींचा स्रोत आहे. आपली प्रगती ही केवळ एक शष्टमांश लोकांचे आयुष्य बदलणार नाही याचे उद्दिष्ट अधिक यशस्वी आणि समृध्द विश्व देखील आहे.
याप्रकारे जगाच्या आवडीचा आपल्या विकासावर परिणाम होईल.
हवामान बदल हे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे.
परंतु हवामान बदलाची परिस्थिती ही आपण निर्माण केलेली नाही. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे जो औद्योगिक युगाच्या भरभराटी आणि प्रगतीचा परिणाम आहे ज्याला फोसिल इंधनाकडून ऊर्जा प्राप्त झाली आहे.
परंतु आज भारतात आपण यांच्या परिणामांचा सामना करत आहोत. शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आव्हाने, ऋतूंच्या आराखड्यात बदल, नैसर्गिक आपत्तींची वाढती संख्या या सर्व रुपांमध्ये आपण हे परिणाम पाहत आहोत.
समुद्राची वाढत्या सीमेमुळे आपण चिंतीत आहोत. यामुळे आपल्या 7500 किलोमीटरच्या किनारपट्टीला आणि 1300 हून अधिक बेटांना धोका निर्माण होईल. हिमनद्यांच्या मागे सरकण्याने आपण चिंतीत आहोत. या हिमनद्यांमुळेच आपल्या नद्यांना पाणी मिळते आणि या नद्यांमध्ये आपल्या सभ्यतेचे संगोपन होते.
त्यामुळेच पॅरिसची परिणती खूप महत्त्वपूर्ण आहे.
आणि म्हणूनच आपण येथे आहोत.
जगाने तत्परतेने कार्य करावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला एक व्यापक, समान आणि शाश्वत करार हवा आहे जो आम्हाला मानवता आणि निसर्गाच्या दरम्यान तसेच आम्हाला जे वारसा म्हणून मिळाले आहे आणि आम्ही जे मागे सोडून जाऊ त्या सर्वात संतुलन बनवायला मदत करेल.
त्याकरिता एक भागीदारी करायला हवी ज्यात आपल्या आवडीचे आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेनुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्याची योजना तयार केली जाईल.
त्यांच्या बांधिलकीची सीमा आणि त्यांच्या कार्याची शक्ती त्यांच्या कार्बन स्पेस अनुरुप असावी.
आणि त्यांना विकसनशील देशांना पुढे जाण्यासाठी आमचे कार्बन स्पेस सोडायला हवे.
जे आवश्यकता आणि इच्छेच्यामध्ये जगत आहेत त्यांच्यासोबत त्यांनी स्रोत आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करायला पाहिजे जेणेकरून आम्ही स्वच्छ ऊर्जेच्या वैश्विक आकांक्षा पूर्ण करू शकू.
याचाच अर्थ विकसनशील देश आपल्या विकासाच्या मार्गावर कार्बनचे पुसट पदचिन्ह सोडण्याचा प्रयत्न करतील.
आमच्या यशस्वीतेयोग्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रयत्नांमध्ये आम्हाला जगाच्या विश्वासाची साथ हवी आहे.
कारण आपली आव्हाने खूप आहेत त्यामुळे आपले प्रयत्न देखील त्वरित हवेत.
मित्रांनो,
आगामी काही दिवसांमध्ये या विषयांवर चर्चा होईल.
भारतीय शामियान्यामध्ये मी अजून काहीतरी सांगायला आलो आहे आणि मी फक्त जगाशी बोलत नाही तर आपल्या लोकांशीही बोलतो.
भारताचा विकास ही आपली नियती आणि आपल्या लोकांचा अधिकार आहे. परंतु आपण एक असा देश आहोत ज्याला हवामान बदलाचा सामना सरसावून केला पाहिजे.
आपल्या लोकांना स्वच्छ हवा, स्वच्छ नद्या, लवचिक शेती, निरोगी निवास तसेच जीवन समृध्द जंगल देणे ही आपली जबाबदारी आहे.
हे आपल्या दृढ निश्चयातूनच साध्य होईल ज्याचे उद्दिष्ट फक्त उच्च उत्पन्न नसून उत्तम दर्जाचे जीवन असेल.
जगासोबत असलेल्या बांधिलकीतून हे साध्य होईल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आपल्या पूर्वापार परंपरा आणि श्रद्धांमधून मिळेल.
भारतामध्ये निसर्गाला नेहमी आईचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळापासून आपण मानवतेला निसर्गाचाच एक अंग मानले आहे. निसर्गाहून महान नाही.
निसर्ग हा मनुष्याच्या शर्यतीसाठी नाही असा आमचा विश्वास आहे, परंतु निसर्गाशिवाय आपले अस्तित्व नाही म्हणून निसर्ग हा देण्यासाठी आणि संगोपनाकरीता आहे शोषणाकरीता नाही.
जेव्हा निसर्गाचे संतुलन व्यवस्थित असेल तेव्हाच आपले जीवन आणि आपले जग संतुलित राहील.
हेच आपल्याला ऋगवेदातील क्षेत्रपाती सुक्तांमधून शिकायला मिळते.
क्षेत्रस्य पते मधुमन्तमूर्मि धेनुरिव पयो अस्मासु धुक्ष्व
मधुश्चुतं घृतमिव सुपूतमृतस्य न: पतयो मृळयन्तु II
याचा अर्थ आहे
पृथ्वीचे देवता, निसर्ग मातेसह गायीच्या दुधासमान आपल्या पृथ्वीला दुग्धमय करो, निसर्ग मातेच्या अधिदानासह लोण्यासमान आमच्यावर कृपा करो.
त्याचमुळे अथर्व वेदात सांगितले आहे की, जीवन शाश्वत राहण्यासाठी पृथ्वीचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
हेच आपल्याला गांधीजींच्या आयुष्यात देखील मिळते. जगामध्ये बरेच काही सर्वांच्या आवश्यकतेसाठी आहे परंतु कोणाच्या अतिहावेसाठी नाही.
हेच आम्ही आज जारी केलेल्या ‘परंपरा’ या आमच्या प्रकाशनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि म्हणूनच पुन:चक्रीकरण आणि संवर्धन आपल्याकडे निसर्गत:च आहे आणि म्हणूनच आपल्या देशात पवित्र वनराई आहे.
मित्रांनो,
हिच भावना आहे जी आपल्याला हवामान बदलाचा सामना करण्याची आकांक्षा आणि सर्वसमावेशक धोरण प्रदान करते.
वर्ष 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही चांगली सुरुवात केली आहे. 2016 पर्यंत अंदाजे 12 गिगावॅट ऊर्जा स्थापित केली जाईल जी वर्तमान क्षमतेच्या लिफ्ट आहे.
आधीच्या सेल्युलर फोनप्रमाणे, आम्ही नवीकरणीय ऊर्जेच्या सहाय्याने आमच्या 1800 गावांना त्वरित आणि स्वच्छ ऊर्जा प्रदान करू.
वर्ष 2030 पर्यंत आपली 40 टक्के स्थापित क्षमता ही बिगैर-फोसिल इंधनावर आधारित असेल.
आम्ही कचऱ्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करू. आम्ही आमच्या शहरांना स्मार्ट आणि शाश्वत बनवू आणि 50 नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सहाय्याने सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट करू.
आम्ही अणुऊर्जा संयंत्रांच्या अति महत्वपूर्ण तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत. आम्ही कोळशावर कर आकारला आहे आणि पेट्रोलियम उत्पादनांवरील अनुदान कमी केले आहे. आम्ही ऑटोमोबाईलच्या मानकात वाढ करीत आहोत. तसेच नवीकरणीय ऊर्जेसाठी कर मुक्त रोखे जारी केले आहेत.
आपले वन क्षेत्र वाचविण्यासाठी आणि जैव विविधतेच्या संरक्षणासाठी आमचे व्यापक कार्यक्रम आहेत.
मागील काही महिन्यांपासून लाखो लोकांनी एलईडी बल्बचा वापर सुरू केला आहे. हजारो दूरसंवाद टॉवरना इंधन म्हणून डिझेलच्या जागी इंधन सेल्स वापरण्याची आमची योजना आहे.
भारताला जागतिक निर्माण केंद्र बनविण्याचे आमचे लक्ष्य हे सोप्या ‘शून्य दोष-शून्य परिणाम’ या तत्त्वावर अवलंबून आहे जिथे निर्दोष उत्पादन तयार केले जाईल ज्याचा पर्यावरणावर काहीही दुष्परिणाम होणार नाही.
‘प्रत्येक थेंबागणिक अधिक धान्य’ हे आमचे अभियान फक्त शेतकऱ्यांचेच जीवनमान सुधारणार नाही तर दुर्मिळ स्रोतांवरील ताण देखील कमी करेल.
आणि स्वच्छ उर्जेमधील संशोधन आणि नाविन्य हे सर्वोत्तम प्राधान्य आहे.
आम्ही कोळशासारखी पारंपारिक ऊर्जा बनवू इच्छितो.
आम्ही स्वस्त नवीकरणीय ऊर्जा बनवू जी आपल्या घरात सहज स्थापित होऊ शकते. आपल्या ट्रान्समिशन लाईनसाठी याला अधिक विश्वसनीय आणि सहज बनवू इच्छितो.
सरकारांपासून समुदायांपर्यंत नाविन्य आणि उद्योगांची अगणित उदाहरणे आहेत जी आपल्या पर्यावरणाचे आरोग्य सुधारत आहेत.
यापैकी काही उपक्रमांची नोंद मी माझ्या ‘कनव्हिनिऐंट ॲक्शन’ या पुस्तकात केली आहे जे आज प्रकाशित केले जाईल.
मित्रांनो,
हा आपला जनतेचा आवाज आहे, देशाचे आवाहन आहे आणि राजनितीची संमती आहे.
वर्ष 1975 मधील स्टॉकहोम ते वर्ष 2009 मधील कोपेनहँगपर्यंत भारतीय नेत्यांनी आणि आजपर्यंतच्या सरकारांनी पर्यावरण संबंधित परिषदांमध्ये नेतृत्व केले आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय प्रयत्नांना पूर्णत: नवीन आयाम देण्याचा प्रयत्न करीत असून यासंदर्भातील आमची आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवत आहोत.
म्हणून आम्ही आमच्या बांधिलकीसह पॅरिसला आलो आहोत, परंतु आमच्यासोबत ‘आशा’ही आहे. आम्ही भागीदारीच्या भावनेसह हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या सामंजस्य करायच्या आराखड्याअंतर्गत चर्चा करू इच्छितो. ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांसह समानतेवर आधारित असावी. आज मी प्रमुख विकसित तसेच विकसनशील देशांच्या नेत्यांसोबत नाविन्य परिषदेत सहभागी होणार आहे. नाविन्य आणि तंत्रज्ञान ही आपल्या सामूहिक यशस्वीतेची किल्ली आहे असा मला विश्वास आहे.
मी राष्ट्रपती ओलांद यांच्यासह 121 सौर संपन्न देशांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर युतीचे सहअध्यक्षस्थान भूषवणार आहे.
मी राष्ट्रपती ओलांद यांना विनंती केली होती की आपली सभ्यता, संस्कृती आणि धर्मांची विशेषत: जगाने पहावी याकरिता त्यांनी संपूर्ण जगाने या संबंधित काय वक्तव्य केले आहे यावर एक पुस्तक तयार करावे. मला आनंद होत आहे की, आज ते पुस्तक प्रकाशित होणार आहे.
मी आपली जीवनशैली बदलण्याचे आवाहन देखील करणार आहे. जेणेकरून आपल्या पृथ्वीवर ताण येणार नाही आपण कशाप्रकारे जगतो आणि विचार करतो यावर आपले निर्भर आहे.
शेवटाकडे वळण्यासाठी मी भारताला परिभाषित करणारी ‘भागीदारीचे चैतन्य, अखंडेत विश्वास’ ही संकल्पना बोलू इच्छितो.
मी भारतीयांना आणि जगातील माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की ते ‘समस्थ सुखीनो भवन्तु’ या संकल्पासह जीवन व्यथित करावे. कल्याणाच्या इच्छेमध्ये आपली पृथ्वी, आपला निसर्ग, सर्व देश आणि संपूर्ण मानवतेचा समावेश असावा.
जर आपला विचार योग्य आहे तर आपण क्षमता आणि आवश्यकतांची जागतिक भागीदारी तयार करू जी आपल्याला कमी कार्बन युगाच्या दिशेने घेऊन जाईल.
धन्यवाद!
S.Mhatre/B. Gokhale
PM @narendramodi at the India Pavilion. @India4Climate pic.twitter.com/NApuNn7U1k
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
The India Pavilion @ COP21 Paris is a display of India's harmony with Nature and Environment. @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
India pavilion also seeks to demonstrate the strong belief that the world needs to look beyond climate change & focus on Climate Justice.
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
The India Pavilion at @COP21 has used technology to showcase India's commitment to climate change & focus on climate justice. @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
This pavilion shows our diversity: Environment Minister @PrakashJavdekar at @COP21 #COP21 @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
Delighted to inaugurate the pavilion. This is the 1st day of a historic summit: PM begins his remarks https://t.co/IFQDXd626I @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
Summit is of great significance to India's future. It is a window to our tradition, progress, aspirations & achievements: PM @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
Climate change is a major global challenge: PM @narendramodi #COP21
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
We want the world to act with urgency. Agreement must lead us to restore balance between humanity & nature: PM @narendramodi @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
India's progress is our destiny & right of our people. But we must also lead in combatting climate change: PM @narendramodi @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
Research & innovation in clean energy is a high priority. Want to make conventional energy cleaner & renewable energy cheaper: PM
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015