पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2013 च्या तुकडीतल्या युवा अधिकाऱ्यांची आज भेट घेऊन चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी केंद्रात, सहाय्यक सचिव म्हणून तीन महिने काम केले आहे. केंद्र सरकारमध्ये काम करुन आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारी ही आयएएस अधिकाऱ्यांची पहिलीच तुकडी आहे.
आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांचा सर्वोत्तम उपयोग करा. आपल्या क्षेत्रात काम कराल तेव्हा जनतेच्या हितासाठी योगदान देण्याची संधी मिळेल.
अनेकदा तुमच्या नव्या कल्पना, दृष्टीकोनांना जुन्या पिढीकडून विरोधही होईल मात्र कठोर मेहनत करुन जनतेला बरोबर घेऊन पुढे जाणे हाच वाटचालीचा मार्ग आहे. हाच लोकांना जोडण्याचा मार्ग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मुद्रा, सरकारी संपर्क सुधार, नागरिककेंद्री सेवा देखरेख, एक भारत-श्रेष्ठ भारत, मृदा आरोग्य कार्ड योजना, राष्ट्रीय खाण उत्खनन धोरण यासह सहा विषयांवर अधिकाऱ्यांनी यावेळी सादरीकरण केले.
N.Chitale/N.Sapre
Our actions must be in tune with our vision. What we learn on the ground is very important: PM to IAS officers of 2013 batch
— PMO India (@PMOIndia) November 19, 2015
These 10 years are very crucial for you. Make the most of these 10 years & ensure your foundations are strong: PM to 2013 batch IAS officers
— PMO India (@PMOIndia) November 19, 2015
You are the people going to manage several districts across India. The positive change you bring will be beneficial for the nation: PM
— PMO India (@PMOIndia) November 19, 2015
Tensions and struggles don't bring change. It is about how many people to integrate: PM to IAS officers of 2013 batch
— PMO India (@PMOIndia) November 19, 2015