पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला, भारत आणि डेन्मार्क यांच्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता क्षेत्रात सहकार्यासाठी झालेल्या कराराबाबत अवगत करण्यात आले.
भारत आणि डेन्मार्क यांच्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता या क्षेत्रात सहकार्यासाठी 22 मे 2018 ला करार करण्यात आला. यामुळे भारत-डेन्मार्क विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधात ऐतिहासिक उंचीवर पोहोचले.
फायदे : –
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता क्षेत्रात परस्परांच्या हितांना प्रोत्साहन देण्यासाठी, परस्परांच्या क्षमतांचा लाभ आता दोन्ही देशांना घेता येणार आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय लिहिला जाईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता क्षेत्रात परस्पर हिताच्या मुद्यांवर भारत आणि डेन्मार्कमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे, विकसित करणे, सुकर करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. यातील हितधारकांमध्ये भारत आणि डेन्मार्क इथल्या वैज्ञानिक संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, संशोधन आणि विकास संस्था आणि कंपन्या आहेत. पुनर्नवीकरणीय ऊर्जा, पाणी, पदार्थ विज्ञान, किफायतशीर आरोग्य निगा, कृत्रिम जीवविज्ञान आणि नील अर्थक्रांती ही क्षेत्रे तात्काळ सहकार्याची क्षमता क्षेत्रे म्हणून ठरवण्यात आली आहेत.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar