ओदिशातल्या चांदीखोल आणि कर्नाटकमधल्या पदुर इथे अतिरिक्त 6.5 दशलक्ष मेट्रिक टन एस पी आर म्हणजे धोरणात्मक पेट्रोलियमसाठे उभारायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.चांदीकोल इथेभूमिगत 4 एम एम टी तर पदुर इथे 2.5 एमएमटी क्षमता राहणार आहे.2017-18 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने दोन अतिरिक्त एस पी आरचीघोषणा केली होती.
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प घेण्यासाठी ही तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.यासाठीच्या अटी आणि शर्थी, वित्तमंत्रालयाशी चर्चा करून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ठरवणार आहे.
आय एस पी आर एल ने कच्च्या तेलाच्या साठयासाठी 5.33 एम एम टी क्षमतेचे तीन भूमिगत खडकाअंतर्गत साठे ,विशाखापट्टणम,(1.33 )मंगलोर (1.5)आणि पदुर (2.5)इथे निर्माण केले आहेत.एस पी आर कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत 5.33 एम एम टी क्षमताभारताच्या 10 दिवसाची क्रूड तेलाची गरज भागवू शकते.मंत्रिमंडळाने 6.5 एमएम टी, एस पी आर सुविधा उभारायला परवानगी दिल्यामुळेभारताच्या ऊर्जा सुरक्षिततेत 12 दिवसांची भर पडणार आहे.
याशिवाय चांदीखोल आणि पदुरमुळे अनुक्रमे ओदिशा आणि कर्नाटक या राज्यात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar