Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन


 

योगाभ्यास हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि एकजूटीचे साधन, दल बनले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुमारे 50 हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह वन संशोधन संस्थेच्या आवारात योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.

जगभरात आज सर्व जण सूर्याच्या साक्षीने योगाभ्यास करत आहेत, हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे. देहराडून ते दबलींग, शांघाय ते शिकागो आणि जकार्ता ते जोहान्सबर्ग पर्यंत प्रत्येक ठिकाणी योगाचा प्रसार झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

योगाभ्यास करणाऱ्या जगातील उत्साही लोकांना स्पष्ट संदेश देतांना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जगाने योगाभ्यासाला आपलसं केले असून, दरवर्षी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभातून याचे दर्शन घडते. उत्तम आरोग्य आणि सुखाच्या शोधात असलेल्यांसाठी योग दिन ही सर्वात मोठी लोक चळवळ बनली आहे, असे ते म्हणाले.

जर संपूर्ण जगाने आपला आदर करावा असे वाटत असेल, तर आपण आपला वारसा आणि ठेवा यांचा आदर करायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. योगाभ्यास हे अतिशय सुंदर आहे कारण ते प्राचीन आहे आणि तरीही आधुनिक आहे, यात आपल्या वर्तमान आणि भूतकाळाचा समतोल असून, आपल्या भविष्यासाठी आशेचा किरण मिळतो, असे ते म्हणाले.

योगाभ्यासाच्या क्षमतेबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, लोकांना तसेच समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर योगाभ्यास हे उत्तर आहे. योगाभ्यासामुळे ताणतणाव विरहीत शांत आणि समाधानी जीवन जगता येऊ शकेल. भेदभाव न करता योगाभ्यास सर्वांना एकत्र आणतो, वैरभावाच्या जागी एकजुटीची भावना निर्माण करतो. वेदना वाढण्याऐवजी योगामुळे आराम मिळतो, असे ही पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane