Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयसीएमआर आणि आयएनएसईआरएम , फ्रान्स यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि इंस्‍टीट्यूट  नेशनल द ला सांतित द ला रिसर्चेमेडिकाले (INSERM), , फ्रान्स यांच्यात मार्च २०१८ मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.

वैशिष्टये:

वैद्यकीय, आयुर्विज्ञान आणि आरोग्य संशोधन क्षेत्रात परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य करणे हा या कराराचा उद्देश आहे. दोन्ही देशांच्या सर्वोत्तम वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे उभय देशांनी पुढील बाबींवर विशेष भर देण्याबाबत सहमती दर्शवली:

 

मधुमेह आणि चयापचय  विकार;

जीन एडिटिंग तंत्राचे  आचार आणि नियमन मुद्द्यांवर केंद्रित जैव-नैतिकता

दुर्मिळ आजार , आणि

उभय देशांमधील चर्चेनंतर परस्पर हिताच्या क्षेत्राबाबत विचार केला जाईल.

या करारामुळे आयसीएमआर आणि आयएनएसईआरएम दरम्यान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या चौकटीअंतर्गत परस्पर हिताच्या क्षेत्रात संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशातील वैज्ञानिक सर्वोत्कृष्टतेमुळे विशिष्ट क्षेत्रातील आरोग्य संशोधनात यशस्वीपणे काम करण्यास मदत मिळेल.

 

N. Sapre/S. Kane