पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इक्वेटोरियल गिनी यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 8 एप्रिल 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या करारामुळे उभय देशांदरम्यान पारंपरिक औषध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील.
संशोधन, प्रशिक्षण अभ्यासक्रम, परिषदा / बैठका, तज्ञांची प्रतिनियुक्ती यासाठी लागणारा निधी आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वापरला जाईल.
N.Sapre/S.Kane/D.Rane