उत्पन्नावरील कराच्या संदर्भात दुहेरी कर आणि कर चुकवेगिरी टाळण्यासाठी भारत आणि कतार यांच्यातल्या करारात सुधारणा करायला केंद्रीयमंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे.
दुहेरी कर टाळण्यासाठीच्या कतार बरोबरच्या सध्याच्या करारावर 7 एप्रिल 1999 ला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि 15
जानेवारी 2000 पासून हा करार अमलात आला. सुधारित करारात अद्ययावत मानकानुसार माहितीचे आदान प्रदान, लाभाच्या
तरतुदीची मर्यादा, तसेच भारताबरोबर नुकत्याच झालेल्या कराराच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
BG/NC
Cabinet clears India-Qatar double taxation avoidance treaty. https://t.co/LEbGoculuA
— PMO India (@PMOIndia) March 22, 2018
via NMApp pic.twitter.com/yKQwzCllpk