पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि मॉरिशसचा लोक सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे यूपीएससी आणि मॉरिशसचा लोक सेवा आयोग यांच्यातील सध्याचे संबंध अधिक दृढ होतील. यामुळे भर्ती क्षेत्रात दोन्ही आयोगांच्या अनुभव आणि आणि ज्ञानाचे आदान -प्रदान करणे शक्य होईल.
सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांच्या लोक सेवा आयोगांमध्ये संस्थागत संपर्क विकसित होईल. यामुळे मॉरिशसचा लोक सेवा आयोग आणि केंद्रीय लोक सेवा आयोग दरम्यान सहकार्याच्या कक्षा स्पष्ट केल्या जातील. यातून उभय पक्षांमध्ये सहकार्याची क्षेत्रे आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यास मदत मिळेल.
सहकार्याची क्षेत्रे पुढीलप्रमाणे:
I. लोक सेवा भर्ती आणि निवडीच्या आधुनिक पद्धतींच्या अनुभवाचे आदान-प्रदान, विशेषतः केंद्रीय लोक सेवा आयोग आणि लोक सेवा आयोगाच्या कामकाजासंदर्भात
II. पुस्तके, मॅन्युअल अन्य कागदपत्रे जी गोपनीय स्वरूपाची नाहीत, त्यांचे आणि माहिती व अनुभवाचे आदान-प्रदान
III. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, संगणक आधारित भर्ती तपासणी आणि ऑनलाईन परीक्षा क्षेत्रात ज्ञानाचे आदान-प्रदान
IV. अर्जांची जलद पडताळणी आणि निपटारा करण्यासाठी एक खिडकी प्रणालीच्या अनुभवांचे आदान-प्रदान
V. सामान्य स्वरूपाच्या परीक्षा प्रणाली संबंधी विविध प्रक्रियांचा अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान
VI. अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन. दोन्ही आयोगांचे अधिकारी जे सचिवालय / मुख्यालयांशी अल्पावधीसाठी जोडले असतील त्यांचा देखील यात समावेश आहे.
VII. प्रदत्त अधिकाराअंतर्गत विविध सरकारी संस्था ज्या पदांवर भर्ती करतात, त्या पार्श्वभूमीवर प्रक्रियांसंबंधी अवलंबण्यात येणाऱ्या प्रणालीच्या अनुभवांचे आदान-प्रदान.
N.Sapre/S.Kane/D.Rane