Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राष्ट्रीय एकता दिना निमित्त राजपथावर आयोजित एकता दौड प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


उपस्थित सर्व मान्यवर,

आज 31 ऑक्टोबर, आपण सरदार साहेबांची 140 वी जयंती साजरी करत आहोत. आजच्या दिवसाचे आणखी एका गोष्टीसाठी विस्मरण होऊ शकत नाही ते म्हणजे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींचे बलिदान. आज जेंव्हा आपण सरदार साहेबांची जयंती साजरी करत आहोत, प्रत्येकवेळी महापुरुषांचे आयुष्य, महापुरुषांची जीवनशैली येणाऱ्या पिढींसाठी एक नवीन ऊर्जा देते, प्रेरणा देते, बळ देते.

देशात कोणालाही या महान वारशांना विसरण्याचा हक्क नाही. देशासाठी प्राण अर्पण करणारे, त्यांच्या विचारधारेचे मुल्यांकन करणे हे आमचे दायित्त्व नाही. त्यांच्या महान कार्याचे स्मरण करणे, त्यातून काही बोध घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्या महान संकल्पांना सोबत घेऊन जगण्याचा प्रयत्न करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. सरदार साहेब, भारताच्या एकतेसोबत एक अतूट नाते ज्या महापुरुषाचे जोडले होते, ते सरदार साहेब होते. त्यांना कोणी एखाद्या वृत्तपत्रातील स्तंभात लोहपुरुष म्हटले म्हणून ते लोहपुरुष ठरत नाहीत. त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात आणि आजही लोहपुरुष म्हटलं की सरदार साहेबांचे चित्र आमच्या नजरेसमोर येते. त्याचे कारण म्हणजे, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय, त्यांना प्रत्येक प्रसंगी जो काही निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळी अत्यंत ताकदीने त्यांनी निर्णय घेतले. म्हणून ते लोहपुरुष नावाने देशात अमर राहिले.

एकापेक्षा अधिक उपाधिंनी सन्मानित होणारे आणि त्या स्वीकृत होणारे लोक जगात फारच कमी असतात. त्यांना सरदार साहेब नावानेही ओळखले जाते, लोहपुरुष नावानेही ओळखले जाते, या दोन्ही बाबी सोबत राहिल्या. असे फार कमी वेळा घडते.

भारताच्या एकतेसाठी सरदार साहेबांचे योगदान कमी लेखून चालणार नाही. इंग्रजांचे स्वप्न होते की देश सोडून गेल्यानंतर हा देश विस्कटला जाईल. राजा-महाराजांमध्ये वैर निर्माण होईल आणि भारत कधीच एकसूत्र बांधला जाणार नाही म्हणून त्यांनी आपल्या शासनकाळात जेवढी शक्य होईल तेवढा फुटीरतवादी प्रवृत्तींवर जोर दिला होता. या सर्व प्रयत्नांतरही सरदार साहेब होते ज्यांनी भारताला एकसूत्र केले. अतिशय कमी कालावधीत त्यांनी हे कार्य केले आणि त्यातून आपल्या राजकीय कौशल्याची ओळख करुन दिली. आपल्या लोह बाजूची त्यांनी ओळख करुन दिली. त्यांनी कौशल्याची ओळख करुन दिली. राजे-महाराजे, ज्यांची एक विशिष्ट उंची होती, समाजात वेगळे स्थान होते त्यांना राजी करणे कठीण काम होते. पण या सर्व बाबी एका निश्चित वेळेत सरदार साहेबांनी करुन दाखवल्या. भारताचा इतिहास पाहिला तर, चाणक्याने चारशे वर्षांपूर्वी देशाला एकत्र बांधण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले होते आणि फार मोठ्या प्रमाणात यश संपादन केले होते. चाणक्यानंतर भारताला एकसूत्र करण्याचे महत्वपूर्ण कार्य जर कोणा महापुरुषाने केले असेल तर ते सरदार वल्लभाई पटेल यांनी केले. म्हणूनच आज काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आम्ही एका स्वरात भारतमातेचे स्मरण करतो. भारत माता की जय असं म्हणतो. या मातेचे रुप बहरण्यासाठी सरदार साहेबांनी फार महत्वाची भूमिका निभावली आहे. म्हणून अशा महापुरुषासाठी, ज्याने एक भारत दिला त्याला श्रेष्ठ भारत बनवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि म्हणून एक भारत श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी सव्वाशे कोटी देशवासियांचा सामुहिक पुरुषार्थ आवश्यक आहे. निर्धारीत लक्ष्याकडे एकत्र वाटचाल करावी लागणार आहे. आपला वेग काळानुरुप वाढवण्याची आवश्यकता आहे आणि या सर्वांची प्रेरणा आपल्याला सरदार साहेबांकडून मिळते.

सरदार साहेब, महात्मा गांधी भारतात परतल्यानंतर सार्वजनिक कार्याला लागले. डिसेंबर 1915 साली सरदार साहेबांनी आपल्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात केली. या डिसेंबर महिन्यात सरदार साहेबांच्या सार्वजनिक आयुष्याच्या शताब्दी वर्षांचा आरंभ होत आहे. त्या अर्थानेही त्यांच्या आयुष्याकडून आपल्याला काय प्रेरणा मिळेल यासाठी आपले निरंतर प्रयत्न सुरू असले पाहिजेत.

सरदार साहेबांची अनेक वैशिष्ट्ये होती. ते सुरुवातीच्या काळात अहमदाबाद महानगरपालिकेत महापौर म्हणून निवडून गेले होते आणि महापौर म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सरदार साहेबांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 222 दिवसात अहमदाबाद शहरात स्वच्छतेची मोठी मोहीम राबवली होती. दररोज ते देशाची पाहणी करत होते आणि स्वच्छतेचे काम 1920, 22, 24 या वर्षांमध्ये सरदार साहेबांनी अहमदाबादचे महापौर म्हणून स्वच्छता मोहीमेसाठी 222 दिवस शहरातील मोहीम चालवणे, ही लहान बाब नाही. त्याकाळातही स्वच्छतेचे महत्व होते, हे सरदार साहेबांच्या कार्यातून आपल्या लक्षात येते. महात्मा गांधींकडून बऱ्याच महत्वाच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळत. सरदार साहेबांच्या या मोहिमेसाठी, कारण महात्मा गांधींनाही स्वच्छता फारच प्रिय होती. म्हणून सरदार साहेबांची 222 दिवसांची मोहीम पाहून त्यांनी फार चांगले वाक्य म्हटले. ते म्हणाले- जर वल्लभ भाई पटेल कचऱ्याचेही सरदार बनत असतील तर मला स्वच्छतेविषयी काळजी करण्याची आवश्यकता आहे. गांधीजींच्या वाक्यात फार सार दडले आहे.

सरदार साहेबांचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ अहमदाबादेत एक राणी व्हिक्टोरिया नावाचे उद्यान आहे. ज्यावेळी सरदार साहेब महापौर बनले त्यावेळी कशाप्रकारे वेगवेगळ्या बाबी हाताळायच्या याविषयी त्यांची खास वैशिष्ट्ये होती. त्यांनी निर्णय घेतला की, जरी उद्यानाचे नाव राणी व्हिक्टोरिया असले तरी उद्यानात पुतळा लोकमान्य टिळकांचा बसवायचा. म्हणून महापौर असताना त्यांनी उद्यानात लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला. इंग्रजांची राजवट होती. राणी व्हिक्टोरिया उद्यान होते. पण हा सरदार साहेबांच्या लोहशक्तीचा अनुभव होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला. पुतळा बसवला तर बसवला शिवाय त्यांनी महात्मा गांधींना आग्रह केला की, तुम्ही या पुतळ्याचे लोकार्पण करा आणि महात्मा गांधींनी व्हिक्टोरिया उद्यानात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यादिवशी महात्मा गांधींनी एक फार महत्वाचे वाक्य लिहिले. त्यांनी लिहिले की- सरदार साहेब अहमदाबाद महानगरपालिकेत आल्यानंतर एका नव्या ताकदीचाही प्रवेश झाला आहे. सरदार साहेबांना गांधीजी कोणत्या रुपात पाहत होते, हे यातून दिसून येते.

आज आम्ही महिला सबलीकणाविषयी बोलतो. महिला आरक्षण कोणी लागू केले, याचे श्रेय कोणी घ्यायचे यावर वाद-विवाद चालूच असतात. पण फार कमी लोकांना माहित असेल की, त्या काळात इंग्रजांचे शासन होते. तेंव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू केले होते. 50 टक्के आरक्षण, 1930 च्या पूर्वीच्या काळाविषयी मी बोलत आहे. सरदार साहेब महिला सबलीकरणाविषयी किती सजग होते हे आम्ही पाहत आहोत. देशाच्या राजकारणात परिवारवाद, चाचा-भतिजावाद यामुळे आमचे राजकारण दुषित झाले आहे. एक सरदार साहेबांचे आयुष्य आहे, जे आम्हाला प्रेरणा देते की त्यांच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचे नाव आज देशाच्या राजकीय नकाशावर दूर-दूरपर्यंत दिसत नाही. किती मोठा संयम दाखवला आहे त्यांनी. कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवण्याचा किती सुविचारी प्रयत्न केला असेल, हे आपल्याला दिसून येते.

सरदार साहेबांचे आयुष्य देशाच्या एकात्मतेसाठी अर्पण केले होते. आजही मला वाटते देशाला पुढे न्यायचे असेल तर, त्याची पहिली हमी आहे ती म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भाषा कोणतीही असेल, वेशभूषा कोणतीही असेल, कोणत्याही प्रेरणेला जोडली असेल, विचार कोणत्याही व्यवस्थेला (विचारप्रणालीला) जोडलेले असतील. पण आम्हा सर्वांचे ध्येय भारमातेला विश्वात नव्या उंचीवर नेणे हे असेल तर त्यासाठी पहिली अट म्हणजे एकता, शांती, सदभावना. एकता, शांती आणि सदभावनेचा मंत्र घेऊन सव्वाशे कोटी भारतीय खांद्याला खांदा लावून जर प्रत्येक नागरिक चालला तर भारत सव्वाशे पावलं पुढे गेलेला असेल. सव्वाशे पावलं पुढे गेलेला असेल आणि एकतेचा हा मंत्र घेऊन एक राष्ट्र, एकतेने जोडलेले राष्ट्र, एकतेचा मंत्र घेऊन चालणारे राष्ट्र, एकतेसाठी सर्वकाही पणाला लावणारे राष्ट्र, हीच आमची सर्वात मोठी शक्ती आहे. सरदार साहेबांचा आपल्यासाठी हाच एकतेचा संदेश आहे.

आगामी काळात भारत सरकारच्या वतीने राज्यांची साथ आणि सहकार्य यासाठी आम्ही एक योजना तयार करण्याचा विचार करत आहोत. मी एक छोटी समिती निर्माण केली आहे. ही समिती याचा आराखडा तयार करत आहे आणि या योजनेचे नाव आहे- एक भारत श्रेष्ठ भारत. कल्पना अशी आहे की, प्रत्येक वर्षी एक राज्य दुसऱ्या राज्याला जोडले जावे. समजा हरियाणाने ठरवले की, 2016 पर्यंत आपल्याला तामिळनाडू राज्याशी जोडायचे आहे. तर, 2016 मध्ये हरियाणातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 100 वाक्य तामीळ भाषेचे शिकवली जातील. प्रत्येक विद्यार्थ्याला तामीळ गीत शिकवले जाईल. तामीळ चित्रपट महोत्सव होईल, तामीळ नाट्य प्रयोग होतील, तामीळ भोजनाचा कार्यक्रम होईल आणि हरियाणातील लोक फिरण्यासाठी तामिळनाडूमध्ये जातील, तामिळनाडूतील लोक हरियाणात येतील. एक वर्ष हरियाणात तामिळनाडू चालेल आणि तामिळनाडूमध्ये हरियाणा चालेल. देशाच्या एकतेसाठी, देशाच्या इतर राज्यांबद्दल माहिती होण्यासाठी, विविध भाषा समजण्यासाठीचा हा सहज उपक्रम होईल.

2017 मध्ये हरियाणा आणखी दुसरे राज्य निवडेल, 2018 साली आणखी दुसरे राज्य निवडेल. आगामी काळात दरवर्षी एक भारत श्रेष्ठ भारत, एक राज्य दुसऱ्या राज्यासोबत जोडले जाईल तेंव्हा भारताची विविधता ओळखता येईल. भारताची शक्ती ओळखता येईल.

ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांनी एक चांगली बाब सांगितली होती, ते म्हणाले, मी प्रथम ज्यावेळी रामेश्वरमहून दिल्लीला रेल्वेने जात होतो. त्यावेळी काही तासांमध्येच नवीन भाषा ऐकायला मिळत होती, खाद्यपदार्थ नवीन येत होते. मला आश्चर्य वाटले की, माझा देश एवढ्या विविधतेने नटलेला आहे. ज्या गोष्टी मला पुस्तकातून समजल्या नाहीत त्या रामेश्वरम ते दिल्ली प्रवासात लक्षात आल्या. हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताच्या या वैशिष्ट्याचा गौरव करणे, याचा अभिमान बाळगणे, या वैशिष्ट्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे ही आमच्या एकतेला नवे बळ देईल. त्या नव्या बळासाठी आज सरदार साहेबांची जयंती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि म्हणून सरदार साहेबांना मी आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो, नमन करतो. त्यांचे आशीर्वाद भारतासाठी त्याग तपस्या करणाऱ्या लक्षावधी महापुरुषांचे आशीर्वाद, आम्हा सर्वांना देशाची एकता, अखंडतेसाठी, भारताच्या विकासासाठी, भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक नवी शक्ती देतील. या महापुरुषांना वंदन करताना माझी हीच इच्छा आहे.

मी याठिकाणी एक संकल्प करतो की, तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही सर्वजण माझ्यानंतर म्हणा. प्रत्येकाने आपल्या जागेवर उभे राहण्याची मी विनंती करतो आणि आपण भारतमातेचे स्मरण करु. भारताच्या या महापुरुषांचे स्मरण करु विशेषतः आज सरदार साहेबांची जयंती आहे, सरदार साहेबांचे स्मरण करु, माझ्या सोबत म्हणा.
मी सत्य निष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी स्वतःला समर्पित करेन. मी आपल्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहचवण्याचा भरपूर प्रयत्न करेन. मी ही शपथ आपल्या देशाच्या एकतेच्या भावनेतून घेत आहे ज्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांची दूरदृष्टी आणि कार्यामुळे शक्य झाले आहे. मी आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी योगदान देण्याविषयी सत्यनिष्ठेने संकल्प करत आहे.

भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय

खूप-खूप आभार.

S. Thakur/S.Tupe/N.