Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडोनेशियाचे राजकीय समन्वय मंत्री डॉ. एच. विरांतो यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


इंडोनेशिया प्रजासत्ताकचे राजकीय, कायदा आणि सुरक्षा व्यवहार मंत्री डॉ. एच. विरांतो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या डिसेंबर 2016 मधील यशस्वी भारत भेटीला पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. या महिन्यात असियान-भारत परिषदेसाठी असियान राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देणार आहेत. तसेच त्यानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विडोडो यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सागरी शेजारी असणाऱ्या भारत आणि इंडोनशिया यांच्यात नील अर्थव्यवस्था तसेच सागरी सुरक्षा क्षेत्रात भागीदारीला मोठा वाव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा चर्चेसंदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीची पंतप्रधानांनी स्वागत केले.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha