पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भू-सीमा पार करण्यासंबंधी भारत आणि म्यानमार यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे दोन्ही देशातील सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या मुक्त संचाराशी संबंधित विद्यमान अधिकारांचे नियमन आणि त्यांच्यात सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल. वैध पारपत्र आणि व्हिजाच्या आधारे लोकांना प्रवास करता येईल आणि उभय देशांदरम्यान आर्थिक आणि सामाजिक संबंध दृढ होतील.
या करारांतर्गत भारत-म्यानमार सीमेवरील लोकांच्या येण्याजाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यातील लोक आणि म्यानमारच्या जनतेंदरम्यान संपर्क सुनिश्चित करण्यात आणि परस्पर संबंध वाढवण्यास मदत मिळेल.
या करारामुळे ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळेल आणि भारताला म्यांमारसह आपल्या भौगोलिक संबंधांचा लाभ उठवण्यात मदत मिळेल. यामुळे परस्पर व्यापार वाढेल आणि उभय देशांमधील जनतेंदरम्यान संबंध मजबूत होतील.
या करारामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांच्या मुक्त संचाराच्या अधिकारांचे रक्षण होईल.,
N.Sapre/S.Kane/Anagha