पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजना अंतर्गत बिलासपूर येथे नवीन एम्स स्थापन करायला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा खर्च 1351 कोटी रुपये आहे.
ठळक वैशिष्ट्य
नवीन एम्स 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल. बांधकाम पूर्व कालावधी 12 महिने, बांधकामाचा कालावधी 30 महिने आणि 6 महिन्याचा स्थैर्य कालावधी
या संस्थेत 750 खाटाची क्षमता असलेले रुग्णालय आणि ट्राउमा सेंटर सुविधा असेल
वर्षाला 100 एमबीबीएस विदयार्थ्यांना प्रवेश देणारे वैद्यकीय महाविद्यालय असेल.
वर्षाला 60 बीएस्सी नर्सिंग विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे नर्सिंग महाविद्यालय असेल.
नवी दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर निवासी संकुले आणि संलग्न सुविधा
या रुग्णालयात 15 ऑपरेशन थिएटर्स सह 20 स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी विभाग असतील.
पारंपरिक वैद्यकीय पध्दतीतील उपचार देणारे 30 खाटाचे आयुष विभागही असेल.
परिणाम
नवीन एम्सच्या स्थापनेमुळे जनतेला सुपरस्पेशालिटी आरोग्यसेवा पुरवणे तसेच या भागात मोठया प्रमाणात डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा दुहेरी हेतू साध्य होईल.
N.Sapre/S.Kane/Anagha