श्रीनगर, जम्मू आणि कश्मीर मधील 30 शाळांच्या एका गटाने आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतीय सैन्य दलाद्वारे नियमितपणे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन सद्दभावना’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सध्या हे विद्यार्थी विविध देशांना भेटी देत आहेत.
पंतप्रधानांनी विविध विषयांवर जसे शिक्षण, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर, तसेच स्वच्छ भारत, विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि आकांक्षा याविषयावर त्यांच्याशी संवाद साधला.
मोठ्या उत्साहपूर्ण संवादा दरम्यान मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधानांनी मुलींच्या शिक्षणासाठी उचललेल्या विविध पावलांबद्दल माहिती सांगितली. आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रां पासून होणाऱ्या विविध फायद्यांचा त्यांनी खुलासा केला. त्यांनी योगा पासून लक्ष केंद्रित करण्यासाठी कसा लाभ होतो हे सुद्धा स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरच्या तरुणांचे नागरी सेवांमध्ये चांगले योगदान असते तसेच ते क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम क्षमता दाखवत आहेत. पंतप्रधानम्हणाले पुढे म्हणाले की, भारताचे भविष्य उज्ज्वल असून जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याच्या भरपूर संधी आहेत.
बी. गोखले