Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे वक्तव्य

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आधी राष्ट्र रत्न होते आणि मग राष्ट्रपती होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत डीआरडीओ भवन येथे डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते आज बोलत होते.

भावी पिढीला प्रेरित करण्यासाठी रामेश्वरम् येथे डॉ. कलामांचे स्मारक बांधण्यात येईल असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, अनेक जण आयुष्यात संधीच्या शोधात असतात, मात्र डॉ. कलामांनी नेहमीच नवीन आव्हाने स्वीकारली. कच्छमध्ये भूकंपानंतररच्या पुनर्बांधणी कार्यादरम्यान डॉ. कलाम यांच्याबरोबर काम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. एक शिक्षक म्हणून आपली ओळख कायम राहावी अशी डॉ. कलामांची इच्छा होती असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भावी पिढीला घडवण्याचे महत्त्व या माजी राष्ट्रपतींना चांगल्या प्रकारे माहित होते. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त भारतात अभिनवतेला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल याचा आपण शोध घ्यायला हवा असे ते म्हणाले.

सायबर-सुरक्षा, सर्वांसाठी घरे, नदी-जोडणी, कृषी उत्पादकता वाढवणे, अर्थव्यवस्थेला गती आणि दोषरहित उत्पादन यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये नावीन्य आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की अत्यंत साधेपणात बालपण व्यतित केलेल्या डॉ. कलामांनी देशाच्या सर्वोच्च नेतेपदी झेप घेतली. मात्र त्याचबरोबर मोठया संस्था देखील उभारल्या. आपण सर्वांनी त्यांच्या उदाहरणातून प्रेरणा घ्यायला हवी असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी डीआरडीओ भवन येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुतळयाचे अनावरण केले. “अ सेलिब्रेशन ऑफ डॉ. कलाम्स लाईफ” या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन त्यांनी केले. डॉ. कलामांवरील टपाल तिकीटाचे प्रकाशनही त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री एम्‌. वेंकय्या नायडू, मनोहर पर्रिकर, रविशंकर प्रसाद आणि डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते.

S.kane/S.Tupe/N.Sapre