Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृषी आणि वनस्पती निगा संबंधित मुद्द्यांवर सहकार्यासाठी भारत आणि इटली यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


कृषीविषयक आणि वनस्पती निगा संबंधित मुद्द्यांवर सहकार्य करण्यासाठी भारत आणि इटली यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. याआधीच्या करारावर जानेवारी 2008 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि त्याची मुदत जानेवारी 2018 मध्ये संपुष्टात येत असून त्या जागी हा नवा करार येईल.

कृषी उत्पादन,पशु पालन, वनस्पती निगा, कृषी संशोधन, अन्नप्रक्रिया आणि उभय बाजूनी निश्चित केलेल्या इतर अतिरिक्त क्षेत्रातले सहकार्य या कराराद्वारे उपलब्ध होणार आहे. कृषी आणि ग्रामीण विकास, तंत्र विषयक देवाण-घेवाण दृढ करणे, कृषी आधुनिकीकरण आणि कृषी-औद्योगिक पायाभूत सुविधा यासंदर्भात उत्पादन सहकार्य, तांत्रिक अडथळे दूर करणे, आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर पशु पालन क्षेत्रात अनुभवाची देव-घेव करण्याची तरतूद या सामंजस्य कराराद्वारे करण्यात आली आहे.

कृषी सहयोगासाठीचे दीर्घकालीन उपक्रम विचारात घेण्याबरोबरच, कृषी क्षेत्रात द्विपक्षीय आदान प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना, या कराराद्वारे करता येणार आहे.

या करारामुळे, उभय देशातल्या, सरकारी संस्था, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्था आणि व्यापार समुदाय यांच्यातला संपर्क सुलभ होण्याबरोबरच त्याला प्रोत्साहनही मिळणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha