प्रधान मंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठीच्या पत आधारित अनुदान योजनेखाली व्याज अनुदानासाठी पात्र घरांच्या कार्पेट क्षेत्रात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
या योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने मध्यम उत्पन्न गटाच्या 1 श्रेणीतल्या, पत आधारित अनुदान योजनेखालील घरांसाठीच्या कार्पेट क्षेत्रात,सध्याच्या 90 चौरस मीटर वरून 120 चौरस मीटर पर्यंत वाढ तर मध्यम उत्पन्न गटाच्या श्रेणी 2 मधल्या पत आधारित अनुदान योजनेखालील घरांसाठी, सध्याच्या 110 चौरस मीटर वरून 150 चौरस मीटर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यम उत्पन्न गटासाठी पत आधारित अनुदान योजना अमलात आली त्या तारखेपासून म्हणजे1 जानेवारी 2017 पासून हा बदल अमलात राहील.
शहरी भागात गृह टंचाईच्या आव्हानाला तोंड देण्याच्या दृष्टीने, मध्यम उत्पन्न गटासाठी पत आधारित अनुदान योजना हे प्रशंसनीय पाऊल आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Malandkar
Hike in carpet area to help middle income buyers: Realtorshttps://t.co/Lm3TvRoD7A
— PMO India (@PMOIndia) November 17, 2017
via NMApp pic.twitter.com/t6i92X10td