सार्क देशांच्या आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. सार्क देशांमधून पोलियोचे उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या बैठकीतल्या चर्चेबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.br>br> आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वोत्तम पध्दतींचं आदान-प्रदान करण्याची मुख्य गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. यासंदर्भात सार्क देशांमध्ये प्राथमिक स्तरावर संशोधन करण्यासाठी संयुक्त दौरे करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.br>br> सार्क देशांमधील लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर सर्वंकष पध्दतीने भर द्यायला हवा असे मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराची त्यांनी प्रशंसा केली. योग हे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे परिणामकारक साधन असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले