Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मसुरी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए, मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना संबोधन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मसुरी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए, मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना संबोधन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मसुरी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए, मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना संबोधन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मसुरी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए, मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना संबोधन.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मसुरी दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए,मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. यामध्ये १७ नागरी सेवा आणि रॉयल भूतान नागरी सेवेतील ३ सेवांच्या अधिकारी, प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

“मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सामील का झालो?” तसेच गृह, शिक्षण, एकात्मिक परिवहन व्यवस्था, कुपोषण, घनकचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास, डिजिटल व्यवहार, “एक भारत – सर्वोत्तम भारत आणि नवीन भारत – 2022” यासारख्या विषयांवर अधिकाऱ्यांनी आपापले सादरीकरण केल्यानंतर पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांना संबोधित केले.

अधिकारी प्रशिक्षणार्थींनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल आपले विचार मांडले.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सर्वप्रथम त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भारत सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांना या सादरीकरणाचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना केल्यात. निरीक्षण आणि प्रतिक्रिया या प्रशिक्षणार्थी अधिकार्यां बरोबरसोबत सामायिक कराव्या असे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रशिक्षणाच्या समाप्तीनंतर त्वरित त्यांचे आयुष्य कसे असावे याबाबत अधिकारी प्रशिक्षणार्थींना सूचना देताना पंतप्रधानांनी सांगितले की, नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांसाठी सतर्क आणि सावध राहिले पाहिजे. त्यांनी सांगितले की पुस्तकांमधून मिळालेल्या ज्ञानामुळे ते नेहमी योग्य मार्गावर चालत राहतील; परंतू त्यांचा संघ आणि लोकांसोबत जर ते जोडले गेले तर ते त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करतील.

योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांनी “जन भागीदारी” यावर जोर दिला.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राज्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने नागरी सेवांची नियुक्ती करण्यात आली होती असे पंतप्रधानांनी सांगितले. आता नागरिक सेवेचा हेतू लोकांची समृद्धी आणि कल्याण हा आहे. नागरी सेवकांनी ही उद्दीष्टे जर अंगीकारली तर सरकारी यंत्रणा आणि लोक यांच्यातील दरी कमी करता येईल.

पंतप्रधानांनी सांगितले की, मसूरीमध्ये प्रशिक्षणाच्या सुरवातीच्या कालावधी दरम्यान सिल्लो समस्या आणि नागरी सेवकांमध्ये असलेली एकसंघ कार्याची कमतरता यावर तोडगा काढण्याचे प्रभावी काम करण्यात आले. फाउंडेशन अभ्यासक्रमादरम्यान अधिकारी प्रशिक्षणार्थींनी केलेल्या ट्रेकचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी त्यांना ट्रेक दरम्यान दाखवलेला उत्साह आणि नेतृत्व त्यांच्या कार्य प्रक्रियेत देखील अंगीकारण्यास सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक चळवळ लोकशाहीमध्ये बदल घडवू शकतात आणि नागरी सेवा ही यासाठी सुवर्णमध्य असावी. काल संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या “वैष्णव जण’ भक्तीगीतातील शब्दाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले,” वैष्णव जन ” या शब्दाऐवजी “नागरी सेवक ” हे शब्द वापरून अधिकारी प्रशिक्षणार्थींनी याचे चिंतन केले पाहिजे.

पंतप्रधानांनी सांगितले की, अनामिकत्व/निनाविपणा ही सरकारी सेविकाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी नागरी सेवांची तुलना अशोक चक्राच्या त्या चौथ्या सिंहाशी केली, जे नेहमीच अदृश्य असते, तरीही त्याची उपस्थिती प्रत्येक वेळी जाणवते.

पंतप्रधानांनी सांगितले की, पर्यटन ही एक महान भारतीय परंपरा आहे आणि पर्यटन करणे तसेच लोकांशी संवाद साधणे हा एक उत्तम शिक्षण अनुभव आहे. प्रशिक्षणार्थींनी आपल्या पोस्टिंग दरम्यान क्षेत्रीय भागाचा दौरा करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित करताना पंतप्रधान म्हणाले की “करिअरची भावना” जी त्यांना एलबीएसएनएएमध्ये यशस्वीरित्या घेऊन आली होती, आता या भावनेचे रुपांतर भारतीयांची सेवा करण्यासाठी “सेंस ऑफ मिशन” मध्ये झाली पाहिजे. ते म्हणाले की भविष्यात, जेव्हा ते या क्षेत्रात काम करतील,तेव्हा हा त्यांचा “जीवन हेतू” असावा.

आज सकाळी,अकादमीच्या लॉन्समध्ये हिमालयाच्या पार्श्वभूमीवर आधारित अधिकारी प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित केलेल्या योग सत्रात पंतप्रधान सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी नवीन रुग्णालय इमारतीचे आणि २०० मीटर बहुक्रियाशील कृत्रिम अॅथलेटिक ट्रकची पायाभरणी केली.

पंतप्रधानांनी अकादमीतील बालवाडीला भेट देवून मुलांबरोबर संवाद साधला. अकादमीची व्यायामशाळा आणि इतर सुविधांची पाहणी केली.

***

बी.गोखले/ एस. म्हात्रे