Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी आणि ग्रामीण) लाभार्थ्यांना पंतप्रधानानी घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. एकात्मिक वाहतूक केंद्र, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गृहनिर्माण प्रकल्प आणि उड्डाणपुलासह अनेक पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांनी केले. तसेच वडोदरा येथे मुंद्रा-दिल्ली पेट्रोलियम उत्पादन पाईपलाइनच्या क्षमता विस्ताराचे आणि एचपीसीएलच्या ग्रीनफिल्ड मार्केटिंग टर्मिनल प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले.

यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि आज वडोदरा येथे शुभारंभ करण्यात आलेल्या विकास कामांचे प्रमाण अभूतपूर्व आहे.

विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी संसाधनांचा वापर करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आपण लहान असल्यापासून घोघा ते दहेज दरम्यान फेरी सेवेबाबत ऐकत आलो आहोत असे पंतप्रधान म्हणाले. आता सर्वांगीण विकासावर सरकारचा भर असून फेरी सेवा आज कार्यान्वित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले कि आधीच्या वर्षांप्रमाणे यावर्षी देखील 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेलांच्या जयंतीदिनी “एकता दौड” आयोजित केली जाईल. यामध्ये उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

N.Sapre/S.Kane/Anagha