Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक पर्यटन दिनााचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींचे जगभरातील पर्यटकांना निमंत्रण


भारतात येऊन, भारताचे सौंदर्य जाणून घ्यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या लोकांना आमंत्रण दिले आहे. देशातल्या युवकांनी देशभरात प्रवास करुन आपल्या देशातले वैविध्य जाणून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

जगभरातल्या लोकांनी भारतात यावे, सौदर्यांने नटलेला भारत जाणून घ्यावा आणि इथल्या जनतेचे आदरातिथ्य अनुभवावे यासाठी, जागतिक पर्यटन दिनी मी या सर्वांना निमंत्रण देत आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

माझ्या युवा मित्रांनी संपूर्ण भारतात भ्रमण करावे आणि या चैतन्यपूर्ण देशाची विविधता अनुभवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

मन की बात या कार्यक्रमाच्या गेल्‍या रविवारच्या 36 व्या भागात पर्यटन  आणि त्याचे फायदे याविषयीच्या आपल्या वक्तव्याची क्लिपही त्यांनी शेअर केली आहे. https://soundcloud.com/narendramodi/unity-in-diversity-is-indias-speciality

 

 

B.Gokhale/N.Chitale/Anagha