Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह पंतप्रधान मोदी यांची पाचवी बातचीत

अतिरिक्त आणि   संयुक्त सचिवांसह पंतप्रधान मोदी यांची पाचवी बातचीत


ठरविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांबरोबरीच्यापाच बैठकीमधिल पंतप्रधान नरेंद्रमोदीयांनी शुक्रवारी ९०सचिवांचीभेट घेऊन बातचीत केली. ही त्याचीशेवटचीबैठकहोती.

या बैठकी दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रशासन, शिक्षण, समाज कल्याण , कृषी, फळबाग, पर्यावरण, प्रकल्प अमंलबजावणी , शहर विकास आणि दळणवळलं क्षेत्रातील अनुभव पंतप्रधानांना विशद केले.

पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रक्रिया सोपी करण्याची विनंती केली. ते म्हणाले की, चांगल्या नियोजित प्रकल्पांची तरतूद अभ्यासासाठी करायला हवी जेणे करून त्या प्रकल्पांच्या यशस्वीतांचे अनुकरण करता येईल.

भारताच्या बाजूने वर्तमान सकारात्मक जागतिक वातावरणावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अधिकार्यांना सांगितले की, 2022 पर्यंत नवीन भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करावे.

******

पी.आई.बी./ बी. गोखले