सेशेल्स संसदेच्या 12 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सभापती मॅट्रिक पिल्लई यांनी या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले. यामध्ये सरकारी नेते चार्ल्स डि कारमोंड यांचाही समावेश होता.
पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या विधिमंडळा दरम्यान वाढत्या आदान-प्रदानाचे स्वागत केले. त्यांनी हिंदी महासागरासह भारत आणि सेशेल्स दरम्यान मजबूत संबंधांची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी मार्च 2015 मध्ये केलेल्या सेशेल्स दौऱ्याची आठवण सांगितली, ज्यामुळे उभय देशांमध्ये सहकार्य आणि जनतेमधील संपर्क अधिक दृढ करण्याबाबत आपली कल्पना मांडली. लोकसभेच्या सभापतींच्या निमंत्रणावरुन सेशेल्सचे संसदीय प्रतिनिधीमंडळ भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहे.
N.Sapre/S.Kane/Anagha
A parliamentary delegation from Seychelles met the Prime Minister. pic.twitter.com/qw01SjEXui
— PMO India (@PMOIndia) August 10, 2017