Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल एम व्यंकय्या नायडू यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. एम. व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन केले आहे.

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल एम. व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन. यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्दीसाठी त्यांना, माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

एम. व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत पक्षात आणि सरकारमध्ये केलेल्या आठवणीनी माझे मन भरून आले आहे.
राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टासाठी कटिबद्ध राहून, दक्ष आणि समर्पित उपराष्ट्रपती म्हणून एम व्यंकय्या नायडू, राष्ट्राची सेवा करतील असा मला विश्वास आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha