Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईशान्य भारतातील पूरस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा ; 2 हजार कोटींहून अधिक मदत केली जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पूरग्रस्त राज्यातील मदत, पुनर्वसन, पुनर्बांधणी आणि पूर नियंत्रण कार्यासाठी 2 हजार कोटी रुपयांहून अधिक मदत पॅकेजची घोषणा केली. या राज्यातील पूर परिस्थिती आणि मदत कार्याचा पंतप्रधानांनी उच्च स्तरीय बैठकांमध्ये आढावा घेतला आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

पंतप्रधानांनी दिवसभरात आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यातील पूरपरिस्थितीचा वेगवेगळया बैठकांमध्ये सखोल आढावा घेतला. या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या मिझोरोमचे मुख्यमंत्र्यांतर्फे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारतर्फे पायाभूत सोयी क्षेत्रासाठी 1 हजार 200 कोटी रुपये देण्यात येतील. या निधीचा उपयोग रस्‍ते, महामार्ग, पूल आणि हानी झालेल्या इतर पायाभूत सुविधांची दुरुस्ती, देखभाल आणि मजबूतीकरण यासाठी वापरला जाईल.

ब्रम्हपुत्रा नदीतील पाणी धारण क्षमता वाढविण्यासाठी 400 कोटी रुपये देण्यात येतील यामुळे पूर नियंत्रणासाठी मदत होईल.

चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने एसडीआरएफ मधील केंद्राचा वाटा म्हणून 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 345 कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले असून, राज्यांना मदत आणि पुनर्वसन कार्यात मदत म्हणून ऊर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल.

या भागात वारंवार येणाऱ्या पूरांवर दिर्घकालीन कालबध्द उपाय शोधण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्यासाठी केंद्राने 100 कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.

भारताच्या एकूण जमीनीपैकी 8 टक्के जमीन असणाऱ्या ईशान्य भारतात देशातील जल स्रोतांपैकी 1:3 जल स्रोत आहेत. या भागातील विस्तृत जल केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्रालयातील प्रतिनिधींची स्रोतांच्या योग नियोजनासाठी एक उच्च स्तरीय समिती केंद्र सरकार स्थापन करणार आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

B.Gokhale/J.Patankar/Anagha