Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेशल्स, मॉरिशस व श्रीलंका या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीचे पंतप्रधानांचे विधान


s2015031062890 [ PM India 184KB ]

पंतप्रधान सेशल्स, मॉरिशस व श्रीलंका या तीन राष्ट्रांशी आपले भरीव, विविधांगी व महत्वपूर्ण संबंध असून भारताच्या परकीय धोरणामध्ये या राष्ट्रांना खूप महत्वाचे स्थान आहे त्यामुळे १० ते १४ मार्च दरम्यान होत असलेल्या या दौऱ्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.

हिंदी महासागरातील या तीन बेटांच्या माझ्या दौऱ्यात भारता लगतच्या व विस्तारीत शेजारी राष्ट्रांशी असलेले परकीय धोरणातील प्राधान्यक्रम अधोरेखित होतात. या प्रांतांशी भारताचे असलेले संबंध वृद्धिंगत करणे देशाच्या सुरक्षा व प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

सेशल्स हा माझ्या दौऱ्याचा पहिला मुक्काम आहे. परस्पर विश्वास व समान तत्वांच्या आधारावर भारताचे सेशल्सशी संबंध प्रस्थापित झाले आहेत. माझी सेशल्स भेट ही १९८१ नंतरची पहिलीच पंतप्रधान भेट आहे. सेशल्स्चे राष्ट्रपती जेम्स मायकल यांच्याबरोबर होत असलेल्या माझ्या भेटीबद्दल मी उत्सुक आहे.

मार्च ११ व १२ दरम्यान मी मॉरिशसला असेन. मॉरिशसमध्ये १२ मार्चला होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझा गौरव करण्यात आला आहे. १२ मार्च हा दिवस भारतीयांसाठीही तितकाच महत्वाचा आहे कारण या दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी दांडी यात्रेस सुरुवात केली होती. छोटा भारत असलेल्या या राष्ट्राबरोबर असलेले भारताचे सांस्कृतिक नाते वृद्धिंगत नाते करणे हे माझ्या मॉरिशस दौऱ्या चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मॉरिशसच्या राष्ट्रीय विधानसभेला संबोधित करण्याची संधी देऊन मॉरिशस सरकारने मला गौरविले आहे. बराकुडा या भारत निर्मित ऑफशोअर पेट्रोल वेसलच्या संयुक्त शुभारंभ सोहळ्यात व त्याचप्रमाणे जागतिक हिंदी सचिवालय वास्तूच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे.

आपले संबंध अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजनांबद्दल मी मॉरिशसचे पंतप्रधान सर अनिरुद्ध जगनाथ यांच्याशी चर्चा करणार आहे. याशिवाय भारताबरोबरील संबंधांना पाठींबा देणाऱ्या मॉरिशसच्या सर्व राजकीय नेत्यांची मी भेट घेणार आहे.

माझी श्रीलंका भेट ही १९८७ नंतरची पहिलीच भारतीय पंतप्रधान भेट आहे.गेल्या महिन्यातील श्रीलंकेच्या राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या भेटी नंतर एका महिन्याच्या काळातील आमची ही दुसरी भेट आहे.

भारताचे श्रीलंकेसोबत असलेले राजकीय, रचनात्मक, आर्थिक, सांस्कृतिक आणि सर्वात थेट लोकांशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा ही एक संधी आहे असे मी मानतो.

आपल्या शेजारील राष्ट्रांशी नियमित संपर्कात राहणे या माझ्या उद्दिष्टाचाच हा दौरा एक भाग आहे.आपल्या अत्यंत महत्वाच्या शेजारी राष्ट्राला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंदित झालो आहे.

राष्टपती मैत्रीपाला सिरिसेना व पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याबरोबर द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. याशिवाय श्रीलंकेतील अन्य राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. या दोन देशांत नवीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे मी सन्मानित झालो आहे. आपल्यातील शाश्वत संबंधांची महत्त्वपूर्ण प्रतिकांचाही माझ्या कार्यक्रमात समावेश आहे. कोलंबोतील महाबोधी वसाहतीला मी भेट देणार आहे व अनुराधापुरा, तला ई मानणार व जाफना आदी प्रांतांना भेट देऊन मी लोकांशी संवाद साधणार आहे. ऐतिहासिक जाफना सरकारी ग्रंथालयाच्या लगत सुरु होत असलेल्या जाफना सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी माझ्या हस्ते होणार आहे.

या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंदी महासागर प्रांतातील या तीनही राष्ट्रांबरोबर असलेले आपले संबंध या भेटीनंतर नव्याने सुरु होतील याची मी खात्री बाळगतो .