Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि जर्मनी यांच्यात आरोग्य क्षेत्रातल्या आशयविषयक संयुक्त निवेदनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


भारत आणि जर्मनी यांच्यात आरोग्य क्षेत्रातल्या आशयविषयक संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली आहे. 1 जून 2017 रोजी यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

पदव्यूत्तर शिक्षण,वैद्यकीय कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण,औषध आणि आरोग्य अर्थशास्त्र या विभागात सहकार्य करण्यात येणार आहे.

सहकार्याबाबतचे अधिक तपशील ठरवण्यासाठी एका कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार असून या आशयविषयक संयुक्त निवेदनाच्या अंमलबजावणीकडेही हा गट लक्ष पुरवणार आहे.

N. Sapre/N.Chitale/Darshana