भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या सायबर सुरक्षेविषयीच्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इंडियन कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी -आयएन) आणि बांग्लादेशाच्या टपाल, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान खात्याअंतर्गत बांग्लादेश गव्हर्मेंट कॉम्पुटर इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम यांच्यात हा सामंजस्य करार झाला आहे. 8 एप्रिल 2017 ला त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सायबर हल्ले, सायबर सुरक्षा,सायबर सुरक्षा धोरण,सायबर सुरक्षा तंत्रज्ञान त्याचप्रमाणे प्रत्येक देशातल्या, समतेवर आधारलेल्या कायद्याला अनुसरून मनुष्यबळ विकासातल्या उत्तम प्रथा यामध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याचा या कराराचा उद्देश आहे.
सायबर सुरक्षेवरच्या स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीकडून या सामंजस्य कराराची अंमलबजावणी केली जाणार आहे.
N. Sapre/N.Chitale/Darshana