Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि श्रीलंका यांच्यात होमियोपॅथी आणि पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि श्रीलंका सरकारच्या आरोग्य,पोषण आणि स्वदेशी औषधी मंत्रालयादरम्यान होमियोपॅथी आणि पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्यासंबंधी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या प्रस्तावित करारावर स्वाक्षरी केल्यामुळे होमियोपॅथी आणि पारंपरिक औषध क्षेत्रात उभय देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत होईल. दोन्ही देशांचा समान सांस्कृतिक वारसा लक्षात घेता हे दोन्ही देशांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.
यामध्ये कोणत्याही आर्थिक परिणामांचा समावेश नाही. संशोधन, प्रशिक्षण अभ्यासक्रम, परिषदा/बैठका यासाठी लागणारा निधी अर्थसंकल्पीय तरतूद आणि आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या योजनांमधून वापरला जाईल.

उभय देशांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होईल. सामंजस्य करारातील नियमानुसार उभय देशांचे उपक्रम असतील आणि करार संपेपर्यंत लागू राहतील.

B.Gokhale/S.Kane/Anagha