Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी पंतप्रधानांची पॅरिस येथे चर्चा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी पंतप्रधानांची पॅरिस येथे चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली.
बैठकीनंतर पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी निवडणुकीतील यशाबद्दल राष्ट्राध्यक्षांचे अभिनंदन केले.

गेल्या काही वर्षांमध्ये फ्रान्स भारत संबंध मानवतेप्रती सेवा आणि मानवी मूल्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या दृढ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हे संबंध भविष्यात आधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि या कारणासाठी भारत आणि फ्रान्सचे संयुक्त प्रयत्न, या बाबींचा उल्लेख केला.

हवामानविषयक पॅरिस करार हा संपूर्ण जगासाठी सामायिक वारसा असल्याचे सांगत मानवाच्या आगामी पिढयांच्या दृष्टीने या पिढीचे हे आशादायक योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पृथ्वीचे संरक्षण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पॅरिस हा आपल्या राजकीय प्रवासातून महत्वाचा भाग असल्याचे नमूद करत या करारासाठी भारत आणि फ्रान्सने खांद्याला खांदा लावून काम केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पर्यावरणाचे रक्षण हा भारतीयांसाठी विश्वासाचा विषय असून ती शतकापूर्वीची जुनी प्रथा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सुसंवाद राखण्याप्रती भारत वचनबध्द असल्याचे सांगत भावी पिढयांना चांगली भेट देण्याच्या दृष्टीने भारत इतरांसोबत सातत्याने प्रयत्नशील राहतो, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या नेत्यांनी दहशतवाद आणि मूलगामी वृत्तीशी लढा देण्यासंदर्भात चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. युरोपियन युनियनच्या विकासाप्रती भारत संवेदनशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

***

B.Gokhale/M.Pange/Anagha